पुणे, 18 जानेवारी 2024: डेक्कन जिमखाना यांच्या वतीने आयोजित नॅशनल एग कॉर्डीनेशन कमिटी(एनइसीसी) यांनी प्रायोजित केलेल्या व आयटीएफ, एआयटीए आणि एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली 22व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 50,000डॉलर महिला टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.हि स्पर्धा डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट या ठिकाणी 20 ते 28 जानेवारी 2024 या कालावधीत रंगणार आहे.
एनईसीसी डेक्कन आयटीएफ महिला टेनिस स्पर्धा ही भारतातील दीर्घकाळ चालत असलेली स्पर्धा असून या स्पर्धेतून खेळलेल्या आर्यना सबलेंका आणि इमा राडूकानू यांनी दोन ग्रँड स्लॅम स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे.
तसेच, या स्पर्धेत याआधी विजेतेपद पटकावलेल्या इमा राडूकानू, आर्यना सबलेंका, बोजना जोवानोवस्की, मागदा लीनेटी, कॅटेरीना बोंडारेन्को या खेळाडूंनी डब्लूटीए टूरमध्ये अव्वल 20खेळाडूंमध्ये देखील स्थान प्राप्त केले आहे.
23 वर्षांपुर्वी नॅशनल एग कॉर्डीनेशन कमिटीच्या(एनइसीसी) च्या अनुराधा देसाई यांनी घेतलेल्या पुढाकाराने एकाच प्रयोजकाचा पाठिंबा लाभलेली आणि सर्वाधिक कालावधीसाठी सुरु असलेली आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांपैकी ही एक स्पर्धा आहे.
आंतरराष्ट्रीय टेनिस संघटना(आयटीएफ), एआयटीए यांच्या पुढाकाराने यावर्षी या स्पर्धेचा दर्जा आणखी उंचावण्यात आला असून 50,000डॉलर रकमेची स्पर्धा यावर्षी आयोजित करण्यात आली आहे. याआधी ही स्पर्धा 25,000डॉलर होती, त्यानंतर 40,000डॉलर करण्यात आली होती. तसेच, गेल्या वर्षीच्या या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे आयोजनापासून पंचांपर्यंत सर्व काम महिलांनी पहिले होते.
2001पासून हि स्पर्धा सुरु असून त्यावेळी या स्पर्धेची पारितोषिकाची रक्कम 5,000डॉलर होती. परंतु 2006-2008मध्ये या स्पर्धेच्या पारितोषिकाची रक्कम वाढविण्यात आली व ती 25,000डॉलर करण्यात आली. 2009मध्ये या स्पर्धेला 10वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 50,000डॉलर करण्यात आली आणि 2010 ते 2020 पर्यंत या स्पर्धेची रक्कम 25,000डॉलर करण्यात आली. एमएसएलटीए, एआयटीए आणि आयटीएफ यांच्या सहकार्याने आगामी वर्षी हि स्पर्धा डॉलर करण्याचा आमचा मानस असल्याचे डेक्कन जिमखानाचे टेनिस विभागाचे सचिव व स्पर्धा संचालक अश्विन गिरमे यांनी सांगितले.
एआयटीएचे सहसचिव व एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांनी सांगितले की, या स्पर्धेमुळे भारतीय खेळाडूंना महत्वपूर्ण डब्लूटीए गुण मिळवण्याची संधी मिळणार आहे.
More Stories
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स, फाल्कन्स ऑप्टिमा, सनबर्ड्स, स्पिअर्स संघांचे विजय