September 24, 2025

एन्ड्युरन्स – एमएसएलटीए 14 वर्षाखालील एटीएफ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत कार्तिका पद्मकुमार हिला दुहेरी मुकुट

छत्रपती संभाजी नगर, दि 19 जानेवारी 2024: एन्ड्युरन्स तर्फे आयोजित व एटीएफ, एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली एन्ड्युरन्स – एमएसएलटीए 14 वर्षाखालील एटीएफ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात कार्तिका पद्मकुमार हिने एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला. तर, मुलांच्या गटात पुण्याच्या वरद उंद्रे याने विजेतेपद संपादन केले.
 एन्ड्युरन्स टेनिस कॉम्प्लेक्स छत्रपती संभाजी नगर येथे पार पडलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या अंतिम फेरीत मुलांच्या गटात पाचव्या मानंकित वरद उंद्रेने  अव्वल मानांकित कोल्हापूरच्या शौनक सुवर्णाचा 7-5, 6-1 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. वरद हा ज्ञानदीप इंग्लिश मिडीयम शाळेत सातवी इयत्तेत शिकत असून पीबीआय टेनिस सेंटर येथे प्रशिक्षक मिलोस मिलूनोविच यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
मुलींच्या गटात अंतिम फेरीत चौथ्या मानांकित कार्तिका पद्मकुमारने अव्वल मानांकित आहाना ए. हीच 6-0, 6-3 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. कार्तिका ही गेअर इंटरनॅशनल शाळेत सातवी इयत्तेत शिकत असून सोल टेनिस अकादमी येथे प्रशिक्षक सुरज बिकनावर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
दुहेरीत अंतिम फेरीत मुलांच्या गटात शौनक सुवर्णा व ईशान यडलापल्ली या अव्वल मानांकित जोडीने इशान बडागी व इशान सुदर्शन यांचा 6-3, 7-6(2) असा पराभव करून विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात आहाना ए. व कार्तिका पद्मकुमार या अव्वल मानांकित जोडीने दुसऱ्या मानांकित शिबानी गुप्तेव वृंदिका राजपूत यांचा 6-2, 6-1 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक व 300 एटीएफ गुण तर उपविजेत्या खेळाडूंना करंडक व 250 एटीएफ गुण देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण आर्मी कॉर्प ऑफ इंजिनियरिंगचे लेफ्टनंट कर्नल एस जे एस ढीलोन आणि एन्ड्युरन्स ग्रुपचे अभिनव मिश्रा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा निरीक्षक वैशाली शेकटकर, सेंटर प्रमुख आशुतोष मिश्रा, मुख्य प्रशिक्षक प्रविण प्रसाद, प्रविण गायसामुद्रे, राधेश्याम अटपाळे, शंकर लबाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: मुले: अंतिम फेरी: मुख्य ड्रॉ:
वरद उंद्रे ( भारत) [5] वि.वि.शौनक सुवर्णा(भारत)[1] 7-5, 6-1
मुली: कार्तिका पद्मकुमार(भारत) [4]वि.वि.आहाना ए. (भारत)[1] 6-0, 6-3
दुहेरी गट: उपांत्य फेरी:
इशान बडागी(भारत)[2]/इशान सुदर्शन (अमेरिका)वि.वि.स्मित उंद्रे (भारत)/ वरद उंद्रे(भारत)  7-6(4), 6-4;
शौनक सुवर्णा (भारत)/ईशान यडलापल्ली (भारत)[1] वि.वि.अरमान दुआ (भारत)/मनन राय(भारत)[4]  6-2, 6-3;
अंतिम फेरी:  शौनक सुवर्णा (भारत)/ईशान यडलापल्ली (भारत)[1] वि.वि.इशान बडागी(भारत)[2]/इशान सुदर्शन (अमेरिका)6-3, 7-6(2);
मुली: उपांत्य फेरी:
आहाना ए. (भारत)/कार्तिका पद्मकुमार(भारत)[1]वि.वि.संयुक्त कृष्णन (भारत)/ दीप्ती वेंकटेशन(भारत)[4]   6-0, 6-0;
शिबानी गुप्ते (भारत)[2] /वृंदिका राजपूत (भारत)वि.वि.श्रीनिती चौधरी (Iभारत) [३] /जान्हवी तम्मिनेदी (भारत)  6-3, 2-6, 10-5;
अंतिम फेरी: आहाना ए. (भारत)/कार्तिका पद्मकुमार(भारत)[1]वि.वि.शिबानी गुप्ते (भारत)[2] /वृंदिका राजपूत (भारत)6-2, 6-1.