December 2, 2025

पुणे बेंगलूर महामार्ग दरी पुलावर चारचाकी वाहनाला आग

पुणे, 19 जानेवारी 2023 – आज दिनांक १९ जानेवारी २०२४ रोजी राञी ०७•४९ वाजता पुणे बेंगलूर महामार्गावर दरी पुलावर एका वाहनाने पेट घेतल्याची वर्दि अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मिळताच दलाकडून सिहंगड रोड अग्निशमन केंद्र येथील अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले.

घटनास्थळी पोहोचताच जवानानी पाहिले असता एक चारचाकी वाहन मोठ्या प्रमाणात पेटले होते. प्रथम जवानांनी या वाहनामधे कोणी अडकले आहे का याची खाञी करुन पाण्याचा मारा सुरू केला व पाच मिनिटात आग आटोक्यात आणत पुर्ण विझवत धोका दूर केला. सदर चारचाकी वाहन (रेनॉल्ड) हे स्वत: गाडी मालक हे कोल्हापूरचे रहिवाशी असून पुण्यावरून कोल्हापूरकडे जात असताना वाहनाच्या पुढील बाजूने धूर येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याचवेळी त्यांनी प्रसंगावधान राखत आपले वाहन रस्याच्या कडेला घेऊन अग्निशमन दलास पाचारण केले. आगीमध्ये वाहन पुर्ण जळाले असून मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत जखमी कोणी नाही.

या कामगिरीत सिंहगड अग्निशमन केंद्रातील वाहनचालक विजय साखरे व तांडेल संतोष भिलारे आणि जवान तुषार करे, अमर आटोळे यांनी सहभाग घेतला.