September 24, 2025

शिवाजीनगर जुन्या एसटी स्टँड च्या जागी संकुल उभारणार – आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे, 20 जानेवारी 2023- शिवाजीनगर एसटी स्टँड लवकरच मूळ जागी येणार असून, तिथे मोठे संकुल उभारुन त्यात शासकीय कार्यालयांची व्यवस्था करण्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवार यांच्या समवेत आज (शनिवारी)झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.

पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी पालकमंत्री अजित पवार यांच्यासमवेत शिरोळे यांची आढावा बैठक झाली. यावेळी शिवाजीनगर एसटी स्टँड मूळ जागी नेण्यात येणार असून मेट्रो मार्फत संकुल उभारून त्यात शासकीय कार्यालयांची व्यवस्था करायची, असे बैठकीत ठरल्याचे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

संकुलासाठी मेट्रो खर्च करणार आहे. त्यातही निधी कमी पडला तर राज्य सरकार मदत करेल, असे आश्वासन पालकमंत्री, श्री अजित पवार यांनी दिले.

शासकीय कार्यालये या जागेत आल्यामुळे महसूल मिळेल, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.