पुणे, 21 जानेवारी 2024: डेक्कन जिमखाना यांच्या वतीने आयोजित नॅशनल एग कॉर्डीनेशन कमिटी(एनइसीसी) यांनी प्रायोजित केलेल्या व आयटीएफ, एआयटीए आणि एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 22व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 50,000डॉलर महिला टेनिस स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत भारताच्या हुमेरा बहरमूस, झील देसाई यांनी पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला. तर, भारताच्या आकांक्षा नित्तुरे, अरुणकुमार लक्ष्मी प्रभा, समीक्षा श्रॉफ, सोहा सादिक, सोनल पाटील, स्मृती भसीन, निधित्रा राजमोहन, संजना सिरिमल्ला, ईश्वरी माथेरे,पवनी पाठक, जेनिफर लुईखम, श्राव्या शिवानी चिलकलापुडी यांचे आव्हान संपुष्टात आले.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत भारताच्या सोळाव्या मानांकित हुमेरा बहरमूस हिने आकांक्षा नित्तुरेचा टायब्रेकमध्ये २-६, ६-७(६), ६-३ असा संघर्षपूर्ण पराभव केला. अकराव्या मानांकित झील देसाईने संजना सिरिमल्लाचा ६-२, ६-० असा सहज पराभव करून आगेकूच केली. नवव्या मानांकित जर्मनीच्या लीना पापडाकिसने भारताच्या समीक्षा श्रॉफचा ६-०, ६-१ असा तर, सहाव्या मानांकित ग्रेट ब्रिटनच्या नैकिता बेन्सने भारताच्या सोहा सादिकचा ५-७, ६-२, ६-२ असा तीन सेटमध्ये पराभव करून पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला.
जपानच्या बाराव्या मानांकित मना कावामुराने भारताच्या निधित्रा राजमोहनचे आव्हान ६-०, ६-० असे सहज मोडीत काढले. थायलंडच्या तेराव्या मानांकित पुनिन कोवापिटुकटेडने सोनल पाटीलला ६-३, ६-३ असे नमविले. स्लोव्हाकियाच्या आठव्या मानांकित व्हिक्टोरिया मोर्वायोवा हिने भारताच्या वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या ईश्वरी माथेरेचा ६-४, ६-० असा पराभव केला. चौदाव्या मानांकित रशियाच्या एकतेरिना याशिनाने एनास्तेसिया ग्रेकिनाचा ३-६, ६-४, ७-५ असा पराभव करून दुसऱ्या पात्रता फेरीत धडक मारली.
स्पर्धेत राज्याची उभरती खेळाडू वैष्णवी आडकर, १८ वर्षाखालील कुमार गटातील राष्ट्रीय विजेती मधुरिमा सावंत, तर एआयटीएच्या वतीने वैदेही चौधरी, श्रीवल्ली रश्मिका भामीदिप्ती यांना मुख्य ड्रॉ मध्ये वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश देण्यात आल्याचे स्पर्धा संचालक अश्र्विन गिरमे यांनी सांगितले.
निकाल: पहिली पात्रता फेरी:
अनौक कोवरमन्स (नेदरलँड)[३]वि.वि.अरुणकुमार लक्ष्मी प्रभा(भारत)६-२, ६-२;
लीना पापडाकिस (जर्मनी)[९]वि.वि.समीक्षा श्रॉफ(भारत) ६-०, ६-१;
नैकिता बेन्स(ग्रेट ब्रिटन)[६]वि.वि.सोहा सादिक(भारत)५-७, ६-२, ६-२;
युकिना सायगो(जपान)[१५]वि.वि.सौम्या विज(भारत)
साकी इमामुरा(जपान)[७]वि.वि.एलेना जमशेदी(डेन्मार्क)६-१, ६-०;
पुनिन कोवापिटुकटेड(थायलंड)[१३]वि.वि.सोनल पाटील(भारत)६-३, ६-३
टीना नादिन स्मिथ(ऑस्ट्रिया)[२]वि.वि.स्मृती भसीन(भारत)६-०, ६-४;
हुमेरा बहरमूस(भारत)[१६]वि.वि.आकांक्षा नित्तुरे(भारत)२-६, ६-७(६), ६-३;
मना कावामुरा(जपान)[१२]वि.वि.निधित्रा राजमोहन(भारत) ६-०, ६-०;
झील देसाई(भारत)[११]वि.वि.संजना सिरिमल्ला(भारत)६-२, ६-०;
एकतेरिना याशिना(रशिया)[१४]वि.वि.एनास्तेसिया ग्रेकिना(रशिया)३-६, ६-४, ७-५;
व्हिक्टोरिया मोर्वायोवा(स्लोव्हाकिया)[८]वि.वि.ईश्वरी माथेरे(भारत)६-४, ६-०;
जेसी एनी(अमेरिका)[१]वि.वि.श्राव्या शिवानी चिलकलापुडी(भारत) ६-४, ६-३
एरी शिमिझू (जपान)[५]वि.वि.पवनी पाठक(भारत)६-२, ६-०;
नाहो सातो(जपान)[४]वि.वि.जेनिफर लुईखम(भारत)६-३, ६-१;
More Stories
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स, फाल्कन्स ऑप्टिमा, सनबर्ड्स, स्पिअर्स संघांचे विजय