पुणे दिनांक २१ जानेवारी, २०२४: ‘मोगरा फुलला…’, ‘ हे सूरांनो चंद्र व्हा…, ‘ घेई छंद मकरंद…’ यांसारख्या एकाहून एक सरस गीतांनी पुणेकरांची आजची सायंकाळ सूरांनी जणू न्हाऊन निघाली. निमित्त होते राष्ट्रीय पुरस्कार विजेते शास्त्रीय गायक राहुल देशपांडे आणि महेश काळे यांच्या सहगायनाचे…
आज वसंतोत्सवाच्या शेवटच्या दिवसाचा समारोप या दोन्ही दिग्गज गायकांच्या सहगायनाने झाला.
कोथरूड येथील सूर्यकांत काकडे फार्मस् या ठिकाणी हा महोत्सव सुरु असून पुनीत बालन समूह यांच्या विशेष सहकार्याने यावर्षीच्या १७ व्या वसंतोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानचे बापू देशपांडे, नेहा देशपांडे, दीप्ती माटे, पु ना गाडगीळ यांच्या अजित गाडगीळ, तेजस उपाध्ये व राजस उपाध्ये आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावर्षी महोत्सवासाठी व्यंकटेश बिल्डकॉन प्रा लि-अंकुश असबे व्हेंचर, भारती विद्यापीठ, पु ना गाडगीळ अँड सन्स, सुहाना मसाले, लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी, गिरिकंद हॉलिडेज, खैतान अँड कंपनी, मॅस्कॉट, डॉन स्टुडीओ आणि एल अँड टी रियल्टी यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
तुज मागतो मी आता… या रचनेने राहुल आणि महेश यांनी आपल्या सादरीकरणाला सुरुवात केली. यानंतर त्यांनी ‘मोगरा फुलला…’ हे गीत सादर केले. हे सूरांनो चंद्र व्हा… या गीताला उपस्थितांनी दिलखुलास दाद दिली… त्यांनी सादर केलेल्या ‘घेई छंद मकरंद…’ या कट्यार मधील नाट्यगीताने उपस्थितांची मने जिंकली.
आम्ही कायम गायकांच्या मैत्रीचे किस्से ऐकत आलो. गायकांच्या मैत्रीत गाण्याची देवाणघेवाण व्हायची हेही ऐकले. वसंतराव देशपांडे आणि पंडित कुमार गंधर्व यांच्यामध्ये अशीच मैत्री होती. हा त्यांचा मोठेपणा होता. माझी अनेक दिवसांची इच्छा होती की मी संगीतबद्ध केलेली एखादी रचना राहुलने गावी. आज ही इच्छा वसंतोत्सव मध्ये पूर्ण होत आहे, याचा आनंद होत आहे असे सांगत महेश काळे आणि राहुल देशपांडे यांनी ‘राम नाम रस भीनी, चदरिया झिनी रे झीनी…’ हे कबीर भजन सादर केले. याचे संगीत महेश काळे यांनी स्वतः दिले आहे हे विशेष.
या नंतर त्यांनी ‘ सुरत पियां की… ही रचना प्रस्तुत केली. ‘कानडा राजा पंढरीचा… या भजनाने त्यांनी समारोप केला.
राहुल आणि महेश या दोघांना निखिल फाटक (तबला), मिलिंद कुलकर्णी (संवादिनी), संजॉय दास (गिटार), विशाल धुमाळ (की बोर्ड), अपूर्व गोखले (व्हायोलिन), रोहन वनगे ( ऑक्टोपॅड), प्रसाद जोशी (पखावज) यांनी साथसंगत केली.
More Stories
तळेगाव–चाकण–शिक्रापुर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी Rs ५९.७५ कोटी निधीस मान्यता
Pune: मुळा-मुठेला प्रदूषणातून सुटका? मंजूर झाला तब्बल ८४२ कोटींचा मेगा प्लॅन
Pune: वसतिगृह स्थलांतरामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय