September 24, 2025

22व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 50,000डॉलर महिला टेनिस स्पर्धेत पात्रता फेरीतील भारतीय खेळाडूचे आव्हान संपुष्टात

पुणे, 22 जानेवारी 2024: डेक्कन जिमखाना यांच्या वतीने आयोजित नॅशनल एग कॉर्डीनेशन कमिटी(एनइसीसी) यांनी प्रायोजित केलेल्या व आयटीएफ, एआयटीए आणि एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 22व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 50,000डॉलर महिला टेनिस स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत भारताच्या हुमेरा बहरमूस, झील देसाई यांना पराभवाचा सामना करावा लागल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले. 
 
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत स्लोव्हाकियाच्या आठव्या मानांकित व्हिक्टोरिया मोर्वायोवाने भारताच्या अकराव्या मानांकित झील देसाईचा ३-६, ६-४, ६-४ असा तीन सेटमध्ये पराभव केला. जपानच्या चौथ्या मानांकित नाहो सातोने भारताच्या सोळाव्या मानांकित हुमेरा बहरमूसला ६-३, ६-१ असे पराभूत केले. थायलंडच्या तेराव्या मानांकित पुनिन कोवापिटुकटेड हिने अव्वल मानांकित अमेरिकेच्या जेसी एनीचा ६-४, ६-१ असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. 
 
चुरशीच्या लढतीत नेदरलँडच्या तिसऱ्या मानांकित अनौक कोवरमन्सने जर्मनीच्या नवव्या मानांकित लीना पापडाकिसचा ६-२, ४-६, ६-२ असा संघर्षपूर्ण पराभव करून मुख्य फेरी  गाठली. ऑस्ट्रियाच्या दुसऱ्या मानांकित टीना नादिन स्मिथने जपानच्या दहाव्या मानांकित मेई यामागुचीचा ६-१, ४-६, ७-५ असा तर, पाचव्या मानांकित जपानच्या एरी शिमिझूने बाराव्या मानांकित मना कावामुराचा ६-२, ६-२ असा पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला. 
 
मुख्य ड्रॉमध्ये एकेरीत बेंगळुरू येथील दुहेरीतील विजेती खेळाडू लात्वियाच्या दरजा सेमिनिस्तजा हिला अग्रमानांकन देण्यात आले आहे. तर, भारताच्या अंकिता रैनाला सातवे मानांकन देण्यात आले आहे. रशियाच्या एनेस्तेसीया तिकोनोव्हाला दुसरे, तर नवी मुंबईमधील विजेती खेळाडू मोयुका उचीजिमाला तिसरे आणि जपानच्या हिमेना साकतसुमीला तिसरे मानांकन मिळाले आहे.  फिलिपिन्सच्या अलेक्सेंड्रा एला हिला पाचवे, फ्रान्सच्या केरॉल मॉनेटला सहावे आणि रशियाच्या तातीयाना प्रोझोरोव्हाला आठवे मानांकन मिळाले आहे.
दुहेरीत नैकिता बेन्स व फानी स्टोलर या जोडीला अव्वल मानांकन, सापफो साकेलरीदी व प्रार्थना ठोंबरे यांना दुसरे, ऋतुजा भोसले व अंकिता रैना याना तिसरे मानांकन देण्यात आले आहे.
 
निकाल: अंतिम पात्रता फेरी: महिला: 
अनौक कोवरमन्स (नेदरलँड)[३]वि.वि.लीना पापडाकिस (जर्मनी)[९] ६-२, ४-६, ६-२;

नैकिता बेन्स(ग्रेट ब्रिटन)[६]वि.वि.युकिना सायगो(जपान)[१५] ६-०, ६-४;
साकी इमामुरा(जपान)[७]वि.वि.
एकतेरिना याशिना(रशिया)[१४]६-४, ७-६(२); 
टीना नादिन स्मिथ(ऑस्ट्रिया)[२]वि.वि.मेई यामागुची(जपान)[१०] ६-१, ४-६, ७-५;
एरी शिमिझू (जपान)[५]वि.वि.मना कावामुरा(जपान)[१२]६-२, ६-२;
व्हिक्टोरिया मोर्वायोवा(स्लोव्हाकिया)[८]वि.वि.झील देसाई(भारत)[११] ३-६, ६-४, ६-४;
पुनिन कोवापिटुकटेड(थायलंड)[१३]वि.वि.जेसी एनी(अमेरिका)[१] ६-४, ६-१;
नाहो सातो(जपान)[४]वि.वि.
हुमेरा बहरमूस(भारत)[१६] ६-३, ६-१;