September 24, 2025

पहिल्या बास्केटबॉल लीग स्पर्धेत पुरुष गटात ब्लेझर्स संघाला विजेतेपद

पुणे, 22 जानेवारी 2023: पीवायसी हिंदु जिमखाना तर्फे आयोजित पहिल्या पीवायसी बास्केटबॉल लीग स्पर्धेत पुरूष गटात ब्लेझर्स संघाने लेकर्स संघाचा 23-16 असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.

पीवायसी बास्केटबॉल कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत पुरुष गटात अंतिम फेरीत ब्लेझर्स संघाने सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. लेकर्सच्या अंकुर शहाने जोरदार खेळ करत ब्लेझर्स संघाला प्रतिउत्तर दिले. पूर्वार्धात ब्लेझर्स संघ लेकर्सविरुद्ध 13-12 अशा फरकाने आघाडीवर होता. ब्लेझर्सच्या अक्षय गडकरी(9गुण)ने सुरेख खेळ करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. लेकर्सकडून अंकुर शहा(10गुण)ने सुरेख खेळ केला.

याआधीच्या उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात निखिल कानिटकर(13गुण)याने केलेल्या सुरेख खेळीच्या जोरावर ब्लेझर्स संघाने वॉरियर्स संघाचा 31-26 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. वॉरियर्सकडून एकाबाजूने लढताना इशांत रेगे ने 19 गुणांची कमाई केली.

तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या या लढतीत इशांत रेगे(11गुण) याने केलेल्या अफलातून खेळीच्या जोरावर वॉरियर्स संघाने विझार्ड्स संघाचा 22-09 असा पराभव करून तिसरा क्रमांक पटकावला.

स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीवायसी हिंदु जिमखानाचे मानद सचिव सारंग लागु, क्लबच्या बास्केटबॉल विभागाचे सचिव अभिषेक ताम्हाणे, सिध्दार्थ भावे, दिपक गाडगीळ, शिरीष साठे,यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कर्णा मेहता, क्षीरीन लिमये आदी मान्यवर उपस्थित होते.

निकाल: अंतिम फेरी: पुरुष गट: उपांत्य फेरी:
ब्लेझर्स: 31(निखिल कानिटकर 13) वि.वि.वॉरियर्स: 26(इशांत रेगे 19गुण); हाफ टाईम: 09-08;
लेकर्स: 37(अंकुर शहा 25) वि.वि.विझार्ड्स: 8(अपुर्व सोनटक्के 6); हाफ टाईम: 27-05;

अंतिम फेरी: ब्लेझर्स: 23(अक्षय गडकरी 9) वि.वि.लेकर्स: 16(अंकुर शहा 10); हाफ टाईम: 13-12

तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी लढत:
वॉरियर्स: 22 (इशांत रेगे 11)वि.वि.विझार्ड्स: 09 (चंद्रशेखर आपटे 9); हाफ टाइम: 15-03;

इतर पारितोषिके:
बेस्ट डिफेंडर: निखिल कानिटकर (ब्लेझर्स);
बेस्ट रिबाउंडर: अक्षय गडकरी(ब्लेझर्स);
बेस्ट पासर: इशांत रेगे(वॉरियर्स);
हायेस्ट स्कोरर: अपुर्व सोनटक्के( विझार्ड्स);
बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट: अंकुर शहा(लेकर्स).