September 24, 2025

तिसऱ्या पीसीएलटीए हौशी टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत 100 हुन अधिक खेळाडूंचा सहभाग

पुणे, 24जानेवारी 2024: पिंपरी चिंचवड लॉन टेनिस अकादमी(पीसीएलटीए) यांच्या वतीने व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या संलग्नतेने पीसीएलटीए  हौशी टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा निगडी प्राधिकरण टेनिस कोर्ट या ठिकाणी 25 ते 28 जानेवारी 2024  या  कालावधीत होणार आहे.
 
स्पर्धेत एकूण 100 हुन अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला असून ही स्पर्धा 35 वर्षावरील,50 वर्षावरील एकेरी व दुहेरी, 25 वर्षांवरील गटात होणार आहे. स्पर्धेत एकुण 1,02,000रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत.  स्पर्धेसाठी वाधवाणी कन्स्ट्रक्शन यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.
 
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक, प्रशस्तिपत्रक व रोख रकमेची पारितोषिके देण्यात येणार  असल्याचे स्पर्धा संचालक नंदु रोकडे यांनी सांगितले.