September 24, 2025

सेंट व्हिन्सेंट ज्युनियर लीग स्पर्धेत बास्केटबॉलमध्ये सेंट व्हिन्सेंट अ संघाला विजेतेपद

पुणे, दि. 4 फेब्रुवारी 2024 – सेंट व्हिन्सेंट हायस्कूल व ज्युनियर कॉलेज यांच्यातर्फे आयोजित सेंट व्हिन्सेंट ज्युनियर लीग  स्पर्धेत बास्केटबॉल लीगमध्ये  सेंट व्हिन्सेंट अ संघाने 21 गुणांसह अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.

सेंट व्हिन्सेंट हायस्कूलच्या फुटबॉल, हॉकी व बास्केटबॉल मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत बास्केटबॉल लीग स्पर्धेत अखेरच्या साखळी फेरीत सेंट व्हिन्सेंट अ संघाने फादर एग्नेल संघाचा 15-7 असा पराभव केला. विजयी संघाकडून साई शिंदे(6गुण), विहान बलाल(6गुण), पियुष मानकरी(3गुण)यांनी सुरेख कामगिरी केली. सेंट व्हिन्सेंट अ संघाने 7 सामन्यात 7 विजय, 21 गुणांसह अव्वल क्रमांक पटकावला. तर, लॉयला स्कुल संघाने 7 सामन्यात 5विजय, 2पराभव, 15गुणांसह दुसरा क्रमांक पटकावला. लॉयला स्कुल संघाने अखेरच्या लढतीत सेंट पॅट्रिक्स संघाचा 16-0 असा एकतर्फी पराभव केला. 

 
सेंट व्हिन्सेंट ब संघाने 7 सामन्यात 4विजय, 2पराभव व 12 गुणांसह तिसरा क्रमांक पटकावला. सेंट व्हिन्सेंट ब संघाने जेएन पेटिट संघावर 19-5 असा विजय मिळवला. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघाला करंडक, पदके अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण हॉकी महाराष्ट्रचे वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज भोरे, सेंट व्हिन्सेंट हायस्कूलचे प्राचार्य फ्रान्सिस पाठेकर, उपप्राचार्य फादर राजा, व्यवस्थापक फादर फ्रान्सिस डिसुझा आणि  डॉ विल्सन अँड्र्यू यांच्या हस्ते करण्यात आले. 
निकाल: बास्केटबॉल लीग:

सेंट व्हिन्सेंट अ: 15 (साई शिंदे 6, विहान बलाल 6, पियुष मानकरी 3)वि.वि.फादर एग्नेल: 7 (अरिहंत शिंदे 6, रझा सय्यद 1);
लॉयला स्कुल: 16(नीव शिंदे 2, अहान बी 2, समेर एस. 2, राम के 6, श्रेयन 4)वि.वि.सेंट पॅट्रिक्स: 0;
सेंट व्हिन्सेंट ब: 19 (निशान जाधव 8, वरद देसाई 6, दरेन डिसूझा 3, श्लोक झंकार 2)वि.वि.जेएन पेटिट: 5 (मोक्ष अग्रवाल 2, सोहम जगताप 3).

 
इतर पारितोषिके: 
बेस्ट प्लेयर: निशाद जाधव(सेंट व्हिन्सेंट स्कुल).