मुंबई ८ फेब्रुवारी २०२४: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएलटीए) आणि क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) आयोजित एल अॅण्ड टी मुंबई ओपन डब्लूटीए १लाख २५हजार डॉलर टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या दुसऱ्या फेरीत भारताच्या ऋतुजा भोसले हिला पराभवाचा सामना करावा लागल्याने तिचे एकेरीतील आव्हान संपुष्टात आले. दुहेरीत भारताच्या प्रार्थना ठोंबरे हिने नेदरलँडच्या अरियानी हॉर्तोनोच्या साथीत उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला.
क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथील टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरीत दुसऱ्या फेरीत अमेरिकेच्या आठव्या मानांकित कॅटी वॉलनेट्स हिने भारताच्या वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या ऋतुजा भोसलेचा टायब्रेकमध्ये ७-६(८), २-६,६-१ असा संघर्षपूर्ण पराभव केला. हा सामना तीन तास चालला. कोरियाच्या सोहयुन पार्क हिने लकी लुझर ठरलेल्या इटलीच्या कॅमिला रोसटेलोचे आव्हान ६-३ ५-७,६-३ असे संपुष्ठात आणले. मागील आठवड्यात एनइसीसी आयटीएफ ५००००डॉलर स्पर्धेत विजेतेपद पटकावलेल्या जपानच्या मोयुका उचीजिमा हिने आपली विजयी मालिका कायम ठेवत हंगेरीच्या दालमा गल्फीचा ६-२, ६-१ असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या प्रार्थना ठोंबरेने नेदरलँडच्या अरियानी हॉर्तोनोच्या साथीत ग्रीसच्या सापफो साकीलारिडी व ऑस्ट्रेलियाच्या ऑलिव्हीया ताजाद्रमुल्लाचा ६-४, ६-२ असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. ग्रेट ब्रिटनच्या नैकिता बेन्स व हंगेरीच्या फॅनी स्टोलर यांनी रशियाच्या एनास्तेसीया तिखोनोव्हा व जपानच्या मोयुका उचीजिमाचा ६-२, ६-२ असा सहज पराभव करून आगेकूच केली.
निकाल: एकेरी: दुसरी फेरी:
सोहयुन पार्क(कोरिया)वि.वि.कॅमिला रोसटेलो(इटली)६-३ ५-७,६-३;
मोयुका उचीजिमा(जपान)वि.वि.दालमा गल्फी(हंगेरी)६-२, ६-१;
कॅटी वॉलनेट्स(अमेरिका)(८)वि.वि.ऋतु जा भोसले(भारत)७-६(८), २-६,६-१;
दुहेरी: उपांत्यपूर्व फेरी:
अरियानी हॉर्तोनो(नेदरलँड)/प्रार्थना ठोंबरे(भारत)वि.वि.सापफो साकीलारिडी(ग्रीस)/ऑलिव्हीया ताजाद्रमुल्ला(ऑस्ट्रेलिया)६-४, ६-२;
नैकिता बेन्स(ग्रेट ब्रिटन)/फॅनी स्टोलर(हंगेरी)वि.वि.एनास्तेसी या तिखोनोव्हा(रशिया)/मोयुका उचीजिमा(जपान)६-२, ६-२;
More Stories
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स, फाल्कन्स ऑप्टिमा, सनबर्ड्स, स्पिअर्स संघांचे विजय