पुणे, 8 फेब्रुवारी 2024: इंटेंसिटी टेनिस अकादमी व शेपिंग चॅम्पियन्स फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एमएसएलटीए इंटेंसिटी टेनिस अकादमी अखिल भारतीय मानांकन(12वर्षाखालील) चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात सोलापूरच्या यशवंतराजे पवार याने, तर मुलींच्या गटात मध्यप्रदेशच्या वैदेही शुक्ला यांनी एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात अंतिम फेरीत प्रवेश करत दुहेरी मुकुटाकडे वाटचाल केली आहे.
खराडी कपिला रिसॉर्ट येथील इंटेंसिटी टेनिस अकादमी टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत मुलांच्या गटात मुख्य ड्रॉच्या उपांत्य फेरीत अव्वल मानांकित आरव बेले याने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत सातव्या मानांकित लक्ष्य त्रिपाठीचा 1-6, 6-2, 6-1 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या सामन्यात तिसऱ्या मानांकित सोलापूरच्या यशवंतराजे पवारने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या लव परदेशीचा 6-2, 6-3 असा पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.
मुलींच्या गटात अव्वल मानांकित वैदेही शुक्लाने मनस्वी राठोडचा 7-5, 6-4 असा तर, पाचव्या मानांकित जान्हवी सावंतने दुसऱ्या मानांकित नक्षत्रा अय्यरचा6-3, 7-5 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
दुहेरीत उपांत्य फेरीत मुलांच्या गटात नक्षत्रा अय्यर व वैदेही शुक्ला या अव्वल मानांकित जोडीने देवेशी पडिया व देविका पिंगे यांचा 6-2, 6-4 असा तर, तिसऱ्या मानांकित जान्हवी सावंत व अस्मी पित्रे यांनी दुसऱ्या मानांकित ख्याती मनीष व हर्षिका सिंगचा 6-1, 6-0 असा पराभव अंतिम फेरीत धडक मारली. मुलांच्या गटात अव्वल मानांकित यशवंतराजे पवार व कबीर गुंडेचा यांनी इथन लाहोटी व अहान जैन यांचा 6-3, 6-2 असा तर,
अद्वैत गुंडने अर्णव पांडेच्या साथीत शौर्य गडदे व तक्षशील नगर यांचा 6-2, 6-3 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.
निकाल: उपांत्य फेरी: मुले:
आरव बेले(1)वि.वि.लक्ष्य त्रिपाठी(7) 1-6, 6-2, 6-1;
यशवंतराजे पवार(3)वि.वि.लव परदेशी 6-2, 6-3;
मुली:
वैदेही शुक्ला(1)वि.वि.मनस्वी राठोड 7-5, 6-4;
जान्हवी सावंत(5)वि.वि.नक्षत्रा अय्यर(2)6-3, 7-5;
दुहेरी: मुली: उपांत्य फेरी:
नक्षत्रा अय्यर/वैदेही शुक्ला(1) वि.वि.देवेशी पडिया/देविका पिंगे(4) 6-2, 6-4;
जान्हवी सावंत/अस्मी पित्रे(3)वि.वि.ख्याती मनीष/हर्षिका सिंग(2)6-1, 6-0;
मुले:
यशवंतराजे पवार/कबीर गुंडेचा(1) वि.वि.इथन लाहोटी/अहान जैन 6-3, 6-2;
अद्वैत गुंड/अर्णव पांडे (3)वि.वि.शौर्य गडदे/तक्षशील नगर (2) 6-2, 6-3;

More Stories
गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ ग्रेड 3 कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत कीर्तना रागिनेनी, नाव्या शर्मा, अव्यक्ता रायावरपू, नमित भाटिया, सक्षम भन्साळी यांचे सनसनाटी विजय
एमएसएलटीए – नवसह्याद्री क्रीडा संकूल अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशीप सिरीज(16वर्षाखालील)टेनिस स्पर्धेत रिशीता यादव हिला दुहेरी मुकुटाची संधी
एमएसएलटीए – नवसह्याद्री क्रीडा संकूल अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशीप सिरीज(16वर्षाखालील)टेनिस स्पर्धेत मयंक राजन, रोहन बजाज, रिशीता यादव, स्वरा जावळे यांचा उपांत्य फेरीत प्रवेश