पुणे, 09 February 2024: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यंगचित्रकला संग्रहालयातर्फे विद्यापीठ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी क्रांतिज्योती सावत्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कृत डॉ. हेमाली जोशी यांनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून विज्ञानातील विविध संकल्पना मुलांना शिकवल्या. शाळेचे मुख्याध्यापक श्री. मोरे सर व शाळेचे सहकारी शिक्षकांनी त्यात मोलाचे सहकार्य केले. व्यंगचित्रांचा वापर केल्याने शैक्षणिक अनुभवला एक सर्जनशील आणि दृष्यात्मक घटकाची जोड मिळते. संकल्पना मजेदार आणि आकर्षक पद्धतीने सादर केल्या जातात, ज्यामुळे विद्यार्थ्यांना वैज्ञानिक संकल्पना समजून घेणे आणि लक्षात ठेवणे सोपे होते. या उद्देशाने कार्यशाळेचे नियोजन संग्रहालयाच्या क्युरेटर डॉ. प्रिया गोहाड यांनी केले होते. या प्रसंगी प्रख्यात व्यंगचित्रकार सूरज एस्के श्रीराम उपस्थित होते. या कार्यशाळेला विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला व मन लावून चित्रे रेखाटली.
More Stories
तळेगाव–चाकण–शिक्रापुर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी Rs ५९.७५ कोटी निधीस मान्यता
Pune: मुळा-मुठेला प्रदूषणातून सुटका? मंजूर झाला तब्बल ८४२ कोटींचा मेगा प्लॅन
Pune: वसतिगृह स्थलांतरामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय