मुंबई, 13 फेब्रुवारी 2024 : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या वतीने आयोजित 18व्या रमेश देसाई मेमोरियल 12 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात दुसऱ्या फेरीत स्वयम रथ, यशवर्धन सिंग, भावेश चौधरी यांनी तर, मुलींच्या गटात सारा फेंगसे, धृती गुंडू यांनी मानांकित खेळाडूंवर विजय आगेकूच केली.
जीए रानडे टेनिस कॉम्प्लेक्स व बॉबे जिमखाना येथे सूरू असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात दुसऱ्या फेरीत महाराष्ट्राच्या बिगरमानांकित सारा फेंगसे हीने राजस्थानच्या अकराव्या मानांकित सौम्या चौधरीचा 6-1, 6-0 असा तर, तेलंगणाच्या धृती गुंडूने दहाव्या मानांकित पंजाबच्या सहेज लाखतचा 6-1, 6-0 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
मुलांच्या गटात कर्नाटकाच्या स्वयम रथ याने पंधराव्या मानांकित हरियाणाच्या देवांश कंबोजचा 1-6, 6-3, 6-4 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव केला. उत्तरप्रदेशच्या यशवर्धन सिंगने दिल्लीच्या अकराव्या मानांकित अर्जुन दुआचा 6-2, 6-2 असा पराभव केला. चुरशीच्या लढतीत राजस्थानच्या भावेश चौधरीने केरळच्या बाराव्या मानांकित ध्रुव शर्माचा टायब्रेकमध्ये 6-3, 6-7(6),6-1 असा पराभव करून आपले आव्हान कायम राखले.
निकाल: मुख्य ड्रॉ: दुसरी फेरी: 12वर्षांखालील मुले:
युवान गर्ग (उत्तरप्रदेश)[1]वि.वि.अद्वैत गुंड(महाराष्ट्र)6-2 6-1;
वीर चतुर (महाराष्ट्र)[9]वि.वि.अथर्व नरसिंघानी(पश्चिम बंगाल)6-1, 6-2;
निर्वाण मार्गना(तेलंगणा)[8]वि.वि.क्रिश बनिवाल (दिल्ली)6-4, 6-2;
सुजइ पोथुला(तेलंगणा)[7]वि.वि.रुक्ष दलवाडी(गुजरात)6-1, 6-0;
आरव छल्लानी(महाराष्ट्र)[4]वि.वि. कबीर दहिया(हरियाणा)6-0, 6-0;
स्वयम रथ(कर्नाटक)वि.वि.देवांश कंबोज(हरियाणा)[15]1-6, 6-3, 6-4;
यशवर्धन सिंग(उत्तरप्रदेश)वि.वि.अर्जुन दुआ(दिल्ली) [11]6-2, 6-2;
पुनीत एम(कर्नाटक)[3]वि.वि.नयन खत्री(दिल्ली)6-0, 6-2;
रोनक हरयानी(राजस्थान)[16]वि.वि.नीव शेठ(महाराष्ट्र)6-2, 7-5;
यशवंतराजे पवार(महाराष्ट्र)वि.वि.कबीर गुंडेचा(महाराष्ट्र)4-6, 6-2, 6-1;
निब्रास हुसेन(आसाम)वि.वि.देवांश आचार्य(महाराष्ट्र)6-3, 6-1;
भावेश चौधरी(राजस्थान)वि.वि.ध्रुव शर्मा(केरळ)[12]6-3, 6-7(6),6-1;
तनिश नंदा (पंजाब)[5]वि.वि.वंश चौधरी(राजस्थान)6-1, 6-0;
रॉनी विजय कुमार(तामिळनाडू)[2]वि.वि.सोहम रणसुभे(महाराष्ट्र)6-2, 6-0;
स्पर्श पाटील (महाराष्ट्र)वि.वि.केम्पेगौडा मंजुनाथ(कर्नाटक)6-3, 6-2;
12वर्षांखालील मुली:
खुशी कादियन(हरियाणा) [2]वि.वि.कनिष्क गोविंद (तामिळनाडू)6-0, 6-2;
सरेना गहलोट(हरियाणा)[3]वि.वि.त्रिशा भोसले(महाराष्ट्र)6-1, 6-0;
पद्मा रमेशकुमार(केरळ)[4]वि.वि.असीस ब्रार(पंजाब)6-1, 6-0;
संरचना दास(ओडिशा) [16]वि.वि.अवनी पुनागंटी (कर्नाटक)6-3, 6-2;
शझफा एसके(पश्चिम बंगाल)[13]वि.वि.वैदेही शुक्ला(मध्यप्रदेश)6-2, 6-2;
दिया आर जानकी(तामिळनाडू)वि.वि.वैदेही शिंदे(मध्यप्रदेश)[15]6-2, 6-3;
झोहा कुरेशी(तेलंगणा)[12]वि.वि.पृथी वेल्लादंडी(केरळ)6-1, 6-1;
धृती गुंडू(तेलंगणा)वि.वि.सहेज लाखत(पंजाब)[10]6-1, 6-0;
एशिथा श्रीयाला (आंध्रप्रदेश)[8]वि.वि.सिद्धी पांडे (उत्तर प्रदेश) 6-3, 6-1;
सारा फेंगसे(महाराष्ट्र)वि.वि.सौम्या चौधरी(राजस्थान)[11]6-1, 6-0;
माहिरा भाटिया(उत्तराखंड)[14]वि.वि.मा यरा शेख(महाराष्ट्र)6-0, 6-2;
More Stories
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स, फाल्कन्स ऑप्टिमा, सनबर्ड्स, स्पिअर्स संघांचे विजय