पुणे, 17 फेब्रुवारी 2024: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना यांच्या वतीने व महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा विभाग यांच्या संलग्नतेने आयोजित पीएमआरडीए पुरस्कृत महा ओपन एटीपी चॅलेंजर 100 पुरूष आंतरराष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत जागतिक क्रमवारीत 93व्या स्थानी असलेल्या भारताचा अव्वल टेनिसपटू सुमित नागल याला अग्रमानांकन देण्यात आले आहे.
ही स्पर्धा म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्टवर 18 ते 25 फेब्रुवारी 2024 या कालावधीत रंगणार आहे.
पुणे मेट्रोपोलिटन रिजनल डेव्हलमेंट ऑथोरीटी (पीएमआरडीए) यांनी प्रायोजित ही स्पर्धा भारतातील एटीपी चॅलेंजर मालिकेतील तिसरी स्पर्धा आहे. यापूर्वीच्या दोन स्पर्धा बंगळुरू आणि चेन्नई येथे पार पडल्या आहेत.
दुहेरीत भारताच्या अर्जुन कढे व जीवन नेद्दूचेझियन यांना अव्वल मानांकन देण्यात आले आहे.
एमएसएलटीएचे चेअरमन प्रशांत सुतार यांनी महाराष्ट्र ओपन चॅलेंजर्स स्पर्धेसाठी एकेरीत निकी पोनाचाला स्पर्धेतील तिसरे वाईल्ड कार्ड दिले. अन्य दोन वाईल्ड कार्ड दुहेरीसाठी भारतीय खेळाडू सिद्धांत बांठिया-परिक्षीत सोमाणी, कार्तिक गंता रेड्डी-करण सिंग यांना देण्यात आली आहेत.
स्पर्धा संचालक सुंदर अय्यर म्हणाले, पीएमआरडीए पुरस्कृत महा ओपन चॅलेंजर स्पर्धेत जागतिक क्रमवारीत यापूर्वी ५० खेळाडूंत स्थान मिळविलेले तीन खेळाडू खेळणार आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा बर्नाड टॉमिक, कॅनडाचा वासेक पोस्पिल आणि फ्रान्सचा बेंजामिन बोन्झी यांचा समावेश आहे.
पात्रता फेरीच्या पहिल्या लढतीत बोंन्झीची गाठ वाईल्ड कार्ड प्रवेश मिळालेल्या सिद्धांत बांठियाशी होईल. टॉमिक आपल्या सुरुवातक विशाल बलसेकरविरुद्ध करेल.
एकेरीत तिसरे वाईल्ड कार्ड असलेल्या पु्ण्याचा १६ वर्षीय अर्णव पापरकर ब्रिटनच्या फेलिक्स गिलशी खेळेल. त्याचवेळी पोस्पिसिलची सलामी चुन हसिन त्सेंगशी होईल.
सर्व लढती सकाळी ११ पासून सुरु होणार असून, सर्व सामन्यांसाटी प्रेक्षकांना विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे.
एकेरीतील खेळाडूंची मानांकन यादी खालीलप्रमाणे:
सुमित नागल(भारत, 93), आदूकोविच दुजे(क्रोएशिया, 125), वॉल्टन ॲडम(ऑस्ट्रेलिया, 153), वॅचेरोट व्हॅलेंटीन(म्यानमार 173), सेवरसिना दालबोर(चेक प्रजासत्ताक,174), क्रॉफर्ड ऑलिव्हर(ग्रेट ब्रिटन, 190), डेन स्विनी (ऑस्ट्रेलिया, 190), जिओ फेडेरिको(इटली, 194)
दुहेरीतील खेळाडूंची मानांकन यादी:
1. अर्जुन कढे/जीवन नेद्दूचेझियन(भारत)
2. पायतोर मातूझेवेस्की (पोलंड)/रोमिस मॅथ्यू(,ऑस्ट्रेलिया)
3. दान एडेड (फ्रांस)/युन सिऑन चँग (कोरिया);
4. एन श्रीराम बालाजी/अँड्र्यू बेंजेमन (जर्मनी).
More Stories
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स, फाल्कन्स ऑप्टिमा, सनबर्ड्स, स्पिअर्स संघांचे विजय