पुणे, 19 फेब्रुवारी 2024: ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या तर्फे व शेपिंग चॅम्पियन्स फाऊंडेशन पुणे यांच्या संलग्नतेने आयोजित एमएसएलटीए आयकॉन रियल्टी करंडक अखिल भारतीय मानांकन(16वर्षाखालील) चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात वरद उंद्रे, नील आंबेकर, अर्जुन वेल्लुरी, नमिश हुड यांनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत आजचा दिवस गाजवला.
महाराष्ट्र पोलिस टेनिस जिमखाना(एमटी),परिहार चौक, औध येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात पहिल्या फेरीत चुरशीच्या लढतीत बिगरमानांकित वरद उंद्रेने तिसऱ्या मानांकित वरद पोळचा टायब्रेकमध्ये 6-3, 4-6, 7-6(5) असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. क्वालिफायर नमिश हुड याने सहाव्या मानांकित विहान जैनचा 6-1, 6-2 असा तर, नील आंबेकर याने सातव्या मानांकित आरव ईश्वरचा 6-3, 6-4 असा पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला. अर्जुन वेल्लुरीने आठव्या मानांकित विश्वजीत चौधरीचा 6-1, 6-2 असा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
अव्वल मानांकित आराध्या म्हसदे याने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या शौनक सुवर्णाचे आव्हान 6-3, 6-0 असे मोडीत काढले. वैष्णव रानवडेने प्रत्युश बगाडेचा 6-1, 6-1 असा सहज पराभव करून आगेकूच केली. शार्दुल खवलेने प्रद्न्येश शेळकेचा 2-6, 6-2, 6-4 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव केला. सनत कडलेने अथर्व येलभरचा 6-7(5), 7-6(2), 6-4 असा पराभव करून दुसऱ्या फेरीत धडक मारली.
निकाल: मुख्य ड्रॉ: पहिली फेरी: मुले:
आराध्या म्हसदे(1) वि.वि.शौनक सुवर्णा 6-3, 6-0;
प्रद्युम्न ताताचर वि.वि. अर्णव भाटिया 6-4, 4-6, 6-3;
नील आंबेकर वि.वि.आरव ईश्वर(7)6-3, 6-4;
कबीर जेटली(4) वि.वि.श्रीनाथ कुलकर्णी 7-5, 7-6(6); सिद्धांत गणेश वि.वि.अहान जैन 6-0, 6-0;
अर्जुन परदेशी वि.वि.स्वर्णिम येवलेकर 7-6(3), 6-4;
अर्जुन वेल्लुरी वि.वि.विश्वजीत चौधरी(8) 6-1, 6-2;
नमिश हुड वि.वि.विहान जैन(6)6-1, 6-2;
शार्दुल खवले वि.वि.प्रद्न्येश शेळके 2-6, 6-2, 6-4;
दक्ष पाटील वि.वि.वीर महाजन 6-0, 6-3;
वरद उंद्रे वि.वि.वरद पोळ(3)6-3, 4-6, 7-6(5);
रोहन बजाज(5) वि.वि.समिहन देशमुख 7-5, 6-2;
वैष्णव रानवडे वि.वि.प्रत्युश बगाडे 6-1, 6-1;
सक्षम भन्साळी(2) वि.वि.आदित्य योगी 6-1, 6-3;
सनत कडलेवि.वि.अथर्व येलभर 6-7(5), 7-6(2), 6-4.
More Stories
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स, फाल्कन्स ऑप्टिमा, सनबर्ड्स, स्पिअर्स संघांचे विजय