पुणे, 19 फेब्रुवारी 2024: युवा उद्योजक आणि मा. नगरसेवक श्री सनी विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमीत्त (२० फेब्रुवारी)सोमेश्वर फौंडेशनच्या वतीने आयोजित सुपर सनी विक”जिल्हा स्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत अंतिम फेरीत शनाया सोनावणे, पूर्वा सातव, संध्या सोनवाल, आर्या सातव, श्रीशा नागुल, सुविज्ञा दोडके, भूमिका लखन यांनी आपापल्या गटातील प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
गोखले नगर येथील शहिद तुकाराम ओंबाळे मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाची बॉक्सिंग रींग उभारलेल्या या मैदानात अंतिम फेरीत कॅडेट गर्ल्स 27 ते 30 वजनी गटात पुर्वा सातवने प्रणिती क्षीरसागरचा 4-1 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. 33 ते 36 वजनी गटात संध्या सोनवालने अनुष्का भारद्वाजचा 4-1 असा तर, 40 ते 43 वजनी गटात आर्या सातवने परी पारधेचा 5-0 असा एकतर्फी पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला.
क्यूब गर्ल्समध्ये 30 ते 33 वजनी गटात शनाया सोनावणेने परिनिधी बिवालचा 5-0 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
सब – ज्युनिअर 46 ते 49 वजनी गटात सुविज्ञा दोडकेने श्रद्धा चौधरीचा 5-0 असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. 37 ते 40 वजनी गटात
श्रीशा नागुल हिने रेणुका कुंभारचा 3-2 असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपदावर आपले नाव कोरले. ज्युनियर 52 ते 54 वजनी गटात भूमिका लखनने रेणुका कदमचा 4-1 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
निकाल: अंतिम फेरी:
क्यूब गर्ल्स: 30 ते 33 वजनी गट:
शनाया सोनावणे वि.वि.परिनिधी बिवाल 5-0;
कॅडेट गर्ल्स:
27 ते 30 वजनी गट:
पुर्वा सातववि.वि.प्रणिती क्षीरसागर 4-1;
33 ते 36 वजनी गट:
संध्या सोनवाल वि.वि.अनुष्का भारद्वाज 4-1;
40 ते 43 वजनी गट:
आर्या सातव वि.वि.परी पारधे 5-0;
सब – ज्युनिअर गट:
37 ते 40 वजनी गट:
श्रीशा नागुल वि.वि.रेणुका कुंभार 3-2;
40 ते 43वजनी गट:
जिज्ञासा कुंभार वि.वि.चैताली एरंडे 4-1;
46ते 49 वजनी गट:
सुविज्ञा दोडके वि.वि.श्रद्धा चौधरी 5-0;
52ते 55वजनी गट:
स्नेया फाळके वि.वि.अनुश्री पाटील 5-0;
ज्युनियर गट:
52 ते 54 वजनी गट:
भूमिका लखन वि.वि.रेणुका कदम 4-1.
More Stories
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स, फाल्कन्स ऑप्टिमा, सनबर्ड्स, स्पिअर्स संघांचे विजय