September 25, 2025

25000डॉलर महा ऊर्जा आयटीएफ महिला टेनिस स्पर्धेत अंजली राठी, सोहा सादिक, वैष्णवी आडकर, आकांक्षा नित्तूरे यांचा मुख्य फेरीत प्रवेश

नागपूर, 4 मार्च, 2024: नागपुर डिस्ट्रिक्ट हार्ड कोर्ट टेनिस असोसिएशन(एनडीएचटीए) यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)च्या संयुक्त विद्यमाने आयोजित आयटीएफ, एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 25000डॉलर महा ऊर्जा आयटीएफ महिला टेनिस स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत भारताच्या अंजली राठी, सोहा सादिक, वैष्णवी आडकर, आकांक्षा नित्तूरे, हुमेरा बहरामूस यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला.

रामनगर येथील एमएसएलटीए टेनिस सेंटर येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत भारताच्या अंजली राठी हिने आपली सनसनाटी निकालाची मालिका कायम ठेवत तिसऱ्या मानांकित जपानच्या मिचिका ओझेकीचा 6-3 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. तेराव्या मानांकित सोहा सादिकने लक्ष्मी गौडाचे आव्हान 6-3 6-2 असे संपुष्टात आणले. चौथ्या मानांकित वैष्णवी आडकरने नवव्या मानांकित पूजा इंगळेचा टायब्रेकमध्ये 3-6 6-0 [10-3] असा पराभव केला. सहाव्या मानांकित हुमेरा बहरामूसने काव्या खिरवारचा 6-2 6-2 असा सहज पराभव करून मुख्य फेरी गाठली. बाराव्या मानांकित महाराष्ट्राच्या आकांक्षा नित्तूरे हिने जोएल निकोलचा 5-7 6-2 [14-12] असा पराभव करून मुख्य फेरीत धडक मारली.

निकाल: अंतिम पात्रता फेरी:
इकुमी यामाझाकी (जपान)[1]वि.वि.सुहिता मारुरी (भारत)[10] 6-1 6-1;
एनास्तेसिया झोलोटारेवा (रशिया)[२]वि.वि.सौम्या विज(भारत) [11] 6-1 6-3;
अंजली राठी (भारत)वि.वि. मिचिका ओझेकी (जपान)[3]6-3 6-2;
रिनॉन ओकुवाकी (जपान)[7]वि.वि.कुंडली मजगाईने (भारत) [14]6-2 3-6 [10-7];
सोहा सादिक (भारत) [13]वि.वि.लक्ष्मी गौडा (भारत) 6-3 6-2;
वैष्णवी आडकर (भारत)[4]वि.वि. पूजा इंगळे (भारत) [9] 3-6 6-0 [10-3]
हुमेरा बहरामूस(भारत)[6]वि.वि.काव्या खिरवार (भारत)6-2 6-2;
आकांक्षा नित्तूरे(भारत) [12]वि.वि. जोएल निकोल (भारत)5-7 6-2 [14-12]

स्पर्धेतील खेळाडूंची मानांकन यादी खालीलप्रमाणे:
एकेरी गट: 1. इरिना मारिया बारा(रशिया, 174), 2. दलिला जाकुपोविक(स्लोव्हाकिया, 215), 3.जस्टिना मिकुलस्कीट(लिथुआनिया, 241), 4. डायना मार्सिन्केविका(लात्विया, 309), 5.सहजा यमलापल्ली(भारत, 324), 6. फॅनी ऑस्टलंड(स्वित्झर्लंड,363), 7. मिरियाना टोना(इटली 387), 8.थासापोर्न नाकलो(थायलंड, 407)

दुहेरी: 1.1. इरिना मारिया बारा(रशिया)/दलिला जाकुपोविक(स्लोव्हाकिया), 2.फॅनी ऑस्टलंड(स्वित्झर्लंड)/एकतेरिना यशीना(रशिया),4.कु येनवू (कोरिया)/ जस्टिना मिकुलस्कीट(लिथुआनिया).