पुणे, ७ मार्च २०२४, पुणे, डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांच्या सन्मानार्थ रुग्णालयाने ५ मार्च २०२४ पासून पाच दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये महिलांसाठी मोटारसायकल रॅली, वूमन प्रीमियर लीग तसेच अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. भाग्यश्री पी. पाटील, प्र- कुलपती, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमात रुग्णालयाच्या वरिष्ठ व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांनी हिरिरीने उपक्रमात सहभाग घेतला.
पाच दिवसीय कार्यक्रमाची सुरुवात हॉस्पिटलच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी गेम्स गाला कार्यक्रम, त्यानंतर मिसमॅच डे आणि इव्हेंटच्या दुसऱ्या दिवशी टीम बिल्डिंग ॲक्टिव्हिटी आयोजित करण्यात आली. तिसऱ्या दिवशी सर्व महिलांसाठी मोटरसायकल रॅली आयोजित करण्यात होती ज्यामध्ये ७० हून अधिक महिला कर्मचाऱ्यांनी पारंपारिक पोशाख परिधान करून उपक्रमात भाग घेतला. यामध्ये महिला प्रीमियर लीग आयोजित केली होती (महिलांसाठी महिला क्रिकेट स्पर्धा), त्यानंतर एक मजेशीर उपक्रम म्हणून ११ मार्च २०२४ रोजी तांबोला (हौजी) खेळाचे आयोजन केले जाईल. १३ मार्च २०२४ रोजी अंतिम फेरी होईल, जिथे एक परफॉर्मिंग आर्ट स्पर्धा होईल ज्यामध्ये सर्व महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग असेल, त्यानंतर विजेत्यांना पुरस्कार देऊन सन्मान केला केला जाईल आणि माननीय डॉ. भाग्यश्री पी. पाटील यांच्या भाषणाने या उत्सवाची सांगता होईल.
जागतिक महिलादिनाच्या शुभेच्छा देताना डॉ. भाग्यश्री पी. पाटील, प्र- कुलपती, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे म्हणाल्या, ” नारी ही माता, भगिनी, कन्या अशा विविध रूपांतून ती नारीशक्तीचे कार्य सर्वार्थाने परिपूर्ण करीत असते. स्त्रीशक्तीचा हा महिमा, संस्कार आणि माणुसकी जपत एक आदर्श शक्ती म्हणून सर्वानाच प्रेरणादायी आहे. स्त्रियांमधील आत्मविश्वास हाच सर्व स्त्रियांना नवीन उभारी देणारा ठरेल. सकारात्मक वृत्ती, जिद्द, जिज्ञासू वृत्ती चांगली असेल तर यशाची शिखरे सहज गाठता येतात. महिलांनी स्वतःला कमी न लेखात अधिक सक्षम करून आपले समाजातील नेतृत्व असेच वृद्धिंगत करावे असे मी त्यांना आवाहन करते.”
More Stories
तळेगाव–चाकण–शिक्रापुर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी Rs ५९.७५ कोटी निधीस मान्यता
Pune: मुळा-मुठेला प्रदूषणातून सुटका? मंजूर झाला तब्बल ८४२ कोटींचा मेगा प्लॅन
Pune: वसतिगृह स्थलांतरामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय