पुणे, 23 मार्च 2024: बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित व पुणे जिल्हा बुद्धीबळ सर्कल (पीडीसीसी) यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या पीडीसीसी जिल्हा खुल्या पुरुष व महिला निवड बुद्धीबळ स्पर्धेत जिल्ह्यातून 187 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा कर्वे रोड येथील अश्वमेध हॉल या ठिकाणी 24 ते 25 मार्च 2024 या कालावधीत रंगणार आहे.
बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त प्रकाश कुंटे यांनी सांगितले की, स्पर्धेला बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट यांचे प्रायोजकत्व लाभले असून एकूण 18,000रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच, ही स्पर्धा स्विस लीग पद्धतीने सात किंवा आठ फेऱ्यांमध्ये खेळविण्यात येणार आहे.
स्पर्धेत मानांकित खेळाडूंमध्ये पुरुष गटात गौरव बाक्लीवाल(2106), संदीप गोहड(2073),गौरव झगडे(1975),शंतनु मिराशी(1935),विरेश शरणार्थी(1887), तर महिला गटात अनुष्का कुतवळ(1697),स्लेशा मडकैकर(1606),श्रावणी उंडाळे(1599), श्रावी बाक्लीवाल(1579) हे खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.
स्पर्धेसाठी आयए राजेंद्र शिदोरे चीफ आरबीटर, तर श्रद्धा विंचवेकर डेप्युटी चीफ आरबीटर म्हणून काम पाहणार आहेत.
More Stories
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स, फाल्कन्स ऑप्टिमा, सनबर्ड्स, स्पिअर्स संघांचे विजय