October 28, 2025

‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभासाठी आधार जोडणी करण्याचे आवाहन

पुणे, दि. ४/१०/२०२४: ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेची रक्कम न आलेल्या महिलांनी आपल्या बँक खात्याशी आधारकार्ड जोडणी व सिडींग करण्यासह आपले बँक खाते सुरू असल्याची खात्री करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करणे तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजना राबविण्यात येत आहे. या योजनेबाबत कोणतीही अडचण असल्यास आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये संपर्क साधावा, असेही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती मनिषा बिरारीस यांनी कळविले आहे.