October 27, 2025

खाजगी क्षेत्रात ही रोजगार असतो हे काँग्रेसचे युवराजांना समजत नाही – पियुष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

पुणे, १३ नोव्हेंबर २०२४ : राज्य सरकारने जी पाऊले उचलली आहे त्यामुळे महाराष्ट्र मध्ये सर्वाधिक परकीय गुंतवणूक येत असून अनेक उद्योग आकर्षित होत आहे. पुणे हे औद्योगिक गुंतवणुकीचे देशातील सर्वाधिक आवडते ठिकाण असून औद्योगिक क्षेत्रात शांतता राहिली पाहिजे. विरोधी पक्ष यांना कधी सवय नव्हती की, देशात किती मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक होत आहे, रोजगार निर्मिती होते. खासगी क्षेत्र सर्वाधिक रोजगार निर्मिती करत आहे ही बाब काँग्रेस युवराज यांना समजत नाही. केवळ सरकारी रोजगार म्हणजे रोजगार निर्मिती नसते. अनेक विकास कामामुळे रोजगार निर्मितीस चालना मिळाली आहे. जगातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारा भारत देश असून आर्थिक महासत्ता होण्याकडे वाटचाल करत आहे असे मत केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

यावेळी भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, कुणाल टिळक, पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर , पुष्कर तुळजापूरकर, हेमंत लेले उपस्थित होते.
गोयल म्हणाले, मुंबई , मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र मध्ये कल्पनापेक्षा अधिक नागरिकांचा प्रतिसाद नागरिकांचा महायुतीला निवडणुकीत मिळत आहे. तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्यावर तिप्पट क्षमतेने ते काम करत आहे. केंद्र सरकार अर्थव्यवस्था मजबूत करत आहे. जागतिक सन्मान वाढत आहे, परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात येत आहे. सन २०४७ पर्यंत विकसित भारत करण्याचा आमचा संकल्प असून राज्यात देखील महायुतीचे सरकार खांद्याला खांदा लावून काम करत आहे. महाराष्ट्र महायुतीने विकास कशाप्रकारे गतीने होतो हे पहिले आहे आणि आघाडी काळात विकास कसा मंदावला हे पहिले आहे. अडीच वर्षाच्या उध्दव ठाकरे सरकारच्या काळातील कारभार पाहून जनता पुन्हा त्यांचे सरकार नको असे सांगत आहे. नांदेड दौऱ्यावर मी असताना काँग्रेस खासदार विरोधात जनतेचा आक्रोश पहिला मिळाला. समाजातील प्रत्येक स्तरा पर्यंत विकास पोहचला पाहिजे याकडे सरकार लक्ष्य देत आहे. मोदी यांचे सक्षम नेतृत्व मध्ये देश विकासाकडे गतीने वाटचाल करत असल्याने उद्योगांना देखील सुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे. महायुती निवडणुकीत प्रचंड मताने विजयी होईल. मुंबईत सर्व जागा महायुतीला मिळतील. देशाच्या व्हिजन बाबत पंतप्रधान यांची भूमिका स्पष्ट आहे. महाराष्ट्र मध्ये महायुती सरकार आल्यावर विकासाची गती अधिक गतीने वाढेल. महाराष्ट्र मध्ये ज्याप्रकारे पायाभूत सुविधा निर्माण होत आहे त्याचा फायदा नागरिकांना होताना दिसून येत आहे. रोजगाराच्या अनेक संधी देखील त्यातून निर्माण होत आहे. औद्योगिक क्रांती देशाला नवीन उंचीवर घेऊन जाईल. जेष्ठ नेते शरद पवार यांनी सत्तेत असताना स्वामिनाथन आयोग यांच्या शिफारस लागू केल्या नाही. पण आम्ही त्यांच्या योजना बाबत गांभीर्याने विचार केला.