पुणे,१७ डिसेंबर २०२४ ः सर्वंकष स्वच्छता मोहिमेअंतर्गत सोमवारी महापालिकेच्या विविध विभागांनी एकत्र येऊन धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत स्वच्छता मोहिम राबविली. या उपक्रमाअंतर्गतच महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने धनकवडी सहकारनगर व बिबवेवाडी येथील रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा उगारला. कारवाईवेळी मोठ्या प्रमाणात फौजफाटा घेऊन अतिक्रमणे काढण्यात आली.
महापालिका प्रशासनाच्यावतीने काही दिवसांपासुन शहरातील विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये “सर्वंकष स्वच्छता मोहिम’ उपक्रम राबवित आहे. आत्तापर्यंत ढोले पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालय, येरवडा नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये ही मोहिम राबविण्यात आली होती. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभाग, अतिक्रमण विभाग, विद्युत विभाग, बांधकाम विभाग, पथ विभाग अशा विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी एकत्र येऊन संबंधित स्वच्छता मोहिम राबवित आहेत.
सोमवारी धनकवडी सहकारनगर, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये महापालिकेच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला. दरम्यान, धनकवडीसह सहकारनगर, बिबवेवाडी येथे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात असलेल्या झोपड्या, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, हातगाड्या, पत्र्यांचे शेड काढुन टाकण्यात आले. अतिक्रमणस विभागाकडुन मोठ्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. पदपथ, रस्त्यांवर आलेले दुकानांचे शेडही काढण्यात आले. याबरोबरच राडारोड, कचरा काढण्यात आला. कर थकबाकी असणाऱ्या व्यावसायिकांनाही यावेळी नोटीस बजावण्यात आली. रस्त्यांवरील बेकायदा केबल्स कापण्यात आल्या. अनेक वर्ष रस्त्यावर उभ्या असलेली बेवारस वाहनेही यावेळी उचलण्यात आली, अशी माहिती अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सोमनाथ बनकर यांनी दिली.

More Stories
Pune: मला कुठलीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी मोजायला मी तयार – माजी आमदार रवींद्र धंगेकर
HND जैन बोर्डिंगचे विश्वस्त श्री जयंत नांदुरकर यांना आचार्य श्री गुप्ती नंदीजी यांनी खडेबोल सुनवत खरेदी व्यवहार रद्द करण्यास सांगितले
Pune: जैन बोर्डिंग प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, मुख्यमंत्र्यांनी जैन बोर्डिंगसाठी १०० कोटी जाहीर करावे – धंगेकर