पुणे, १८ डिसेंबर २०२४: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात मंत्रिपद नाकारल्याने त्यांच्या समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या फोटोला जोडे मारले. हा प्रकार गंभीर असून चुकीचा आहे. यापुढे असा प्रकार घडल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी दिला.
राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये काँग्रेस नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद नाकारण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी आंदोलन करत अजित पवार यांच्या फोटोला जोडी मारण्याचा प्रकार केला. या प्रकाराबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नाराजी व्यक्त करण्यात आली याबाबत शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.
मानकर म्हणाले, “अजित पवार यांनी आतापर्यंत विविध जाती धर्माच्या लोकांना संधी देऊन पुढे आणले आहे. मंत्रिमंडळात विस्तारामध्येही त्यांनी ओबीसी समाजाच्या चार जणांना मंत्रिपदाचे संधी दिली. तसेच इतर समाजाला देखील संधी दिली आहे. भुजबळ यांच्या मुलाला विधान परिषदेवर संधी दिली आहे. भुजबळ हे केवळ एकटेच ओबीसी समाजाचे नेते नाहीत. त्यांना मंत्रिपद मिळाले नाही म्हणून, त्यांच्या समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या फोटोला जोडे मारणे गंभीर आहे. अजित पवार हे आमच्या पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत. या प्रकाराबाबत भुजबळ यांनी ही आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले पाहिजे. आम्ही यापुढे असा प्रकार खपवून घेणार नाही. यापुढे घडल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल.”
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात का ? याबाबत मानकर म्हणाले, ” दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आमच्यासाठी आनंदाचा क्षण असेल. त्याचे आम्ही स्वागतच करू.”

More Stories
Pune: मला कुठलीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी मोजायला मी तयार – माजी आमदार रवींद्र धंगेकर
HND जैन बोर्डिंगचे विश्वस्त श्री जयंत नांदुरकर यांना आचार्य श्री गुप्ती नंदीजी यांनी खडेबोल सुनवत खरेदी व्यवहार रद्द करण्यास सांगितले
Pune: जैन बोर्डिंग प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, मुख्यमंत्र्यांनी जैन बोर्डिंगसाठी १०० कोटी जाहीर करावे – धंगेकर