पुणे, १८ डिसेंबर २०२४: शहरातील कात्रज चौकातील उडडाणपुलाच्या कामासाठी दोन्ही बाजुला सर्व्हिस रस्ता करण्यात येणार आहे. त्यासाठी भुसंपादनाची कार्यवाही तातडीने सुरू आहे. कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामासाठी राज्यसरकारकडुन १४० कोटी आले आहेत. त्यातुन हे भुसंपादन केले जाणार आहे. येत्या १५ दिवसात हे भुसंपादन मार्गी लागणार आहे, असे पुणे महापालिकेेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.
कात्रज-कोंढवा रस्त्याचे भूसंपादन होत नसल्यामुळे हा प्रकल्प रखडला आहे. अगोदर ८४ मीटरचा रस्ता करण्यात येणार होता. मात्र भूसंपादनासाठी लागणारा खर्च वाढत असल्यामुळे सुरुवातीला ५० मीटर रस्ता विकसित करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. पण ररस्त्याचे काम रखडल्यामुळे कात्रजकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. शासनाकडून महापालिकेस १४० कोटींचे अनुदान मिळालेले असूनही ही प्रक्रिया रखडलेली आहे त्यामुळे आयुक्तांनी स्वत: बैठक घेत प्रशासनास तातडीनं भूसंपादनाचे आदेश दिले होते. या जागामालकांसोबत तसेच या पुलाच्या कामात कोंढव्याच्या दिशेच्या रॅम्पच्या कामासाठी जागांच्या मालकांची बैठक महापालिका आयुक्तांनी घेतली होती. त्यातुन हे भुसंपादन केले जाणार आहे. येत्या १५ दिवसात या भागाचे हे भुसंपादन मार्गी लागणार आहे, अशी माहिती आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

More Stories
Pune: मला कुठलीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी मोजायला मी तयार – माजी आमदार रवींद्र धंगेकर
HND जैन बोर्डिंगचे विश्वस्त श्री जयंत नांदुरकर यांना आचार्य श्री गुप्ती नंदीजी यांनी खडेबोल सुनवत खरेदी व्यवहार रद्द करण्यास सांगितले
Pune: जैन बोर्डिंग प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, मुख्यमंत्र्यांनी जैन बोर्डिंगसाठी १०० कोटी जाहीर करावे – धंगेकर