पुणे, २३ डिसेंबर २०२४: विदर्भातून रोजगाराच्या शोधामध्ये पुण्यात आलेल्या कुटुंबावर मद्यधुंद डंपर चालकाने घाला घातला. नगर रस्त्यावर वाघोली येथे पादचारी मार्गावर झोपलेल्या नऊ जणांना टँकरने चिडल्याची धक्कादायक घटना घडली. या भयानक घटनेमध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झालेले आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून डंपर चालकांच्या बेदरकारपणाचा पुन्हा एकदा सामान्य नागरिक बळीचा बकरा ठरलेली आहेत. याप्रकरणी वाघोली पोलिसांनी डंपर चालकास अटक केलेली आहे.
विशाल विनोद पवार (वय 22), वैभवी रितेश पवार( वय 1), वैभव रितेश पवार (वय 2, सर्व रा.अमरावती) असे मूर्ती मुखी पडलेल्या तिघांची नावे आहेत तर.
जानकी दिनेश पवार, (वय 21) रिनिशा विनोद पवार, (वय 18 ), रोशन शशादू भोसले, (वय 9), नगेश निवृत्ती पवार, (वय 27 ), दर्शन संजय वैराळ, (वय 18), आलिशा विनोद पवार (वय 47) हे सहा जण जखमी झालेले आहेत. याप्रकरणी वीरेंद्र परमदासजी भोसले (वय 45, सध्या रा. केसनंद फाटा, मूळ रा. सारवाडी देववाडी, तालुका कारंजा घाडगे जिल्हा वर्धा).
डंपर चालक गजानन शंकर तोटरे, (वय 26 वर्ष सध्या रा./तानाजी हरगुडे यांचे खोलीत, केसनंद ता.हवेली, मूळ राहणार पाळा तालुका मुखेड जिल्हा नांदेड) याला अटक करण्यात आलेली आहे. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
फिर्यादी आणि जखमी झालेले नागरिक हे रोजगाराच्या शोधामध्ये पुण्यामध्ये आलेले आहेत मजुरी बिगारी काम करून ते त्यांचा उदरनिर्वाह करतात आणि रात्रीच्या वेळी वाघोली परिसरातील मोकळ्या जागेवर गायरानावर मुक्काम करत असतात सोमवारी मध्यरात्री एक वाजता डंपर चालक गजानन तोटरे हा मध्य धुंद अवस्थेत भरता वेगात डंपर चालवत होता.
केसनंद फाटा चौकातील फुटपाथ लगत गायरान जागेमध्ये फिर्यादी आणि त्याच्यासोबत चे नागरिक झोपलेले होते.
त्यावेळी पुण्याकडून केसनंद कडे जाणारा हायवा डंपरवरील( MH 12/VF/0437) चालक तोटरे यांचे दारूच्या नशेमुळे नियंत्रण गेले.
त्याने डंपर थेट पादचारी मार्गावर बसवला त्यावेळी झोप येत असलेल्या नवजनांना डंपरने चिडले या अपघातामुळे मध्यरात्री एक वाजता मोठी खळबळ उडाली पुणे नगर महामार्गावर असलेल्या नागरिकांनी मदतीसाठी धावपळ सुरू केली त्यावेळी हा डंपर चालक मध्य धुंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. नागरिकांनी त्याच पकडून ठेवले नंतर पोलिसांचे हवाली केले दरम्यान या अपघातात एक आणि दोन वर्षाचे सख्खे भाऊ-बहीण मृत्युमुखी पडलेले आहेत यामुळे त्यांच्या कुटुंबांना धक्का बसला अनेक जण गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना काहीच हालचाल करता येत नसल्याचे निदर्शनास आले या घटनेची माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी घटनास्थळी घेतली जखमींना ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेली आहे.
पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड करत आहेत .
सख्या भावबहिणीचा अपघातात मृत्यू
दिवसभर आई-वडिलांसोबत मजुरीच्या ठिकाणी मागे पुढे फिरणारे हे लहान मुले रात्रीच्या वेळी थकून कडाक्याच्या थंडीत आई-वडिलांच्या कुशीमध्ये गाढ झोपलेले होते. पण मद्यधुंद चालकाने डंपर थेट त्यांच्या अंगावर चढवल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात वैभवी रितेश पवार आणि वैभव रितेश पवार या या दोघांचा मृत्यू झाला. त्यांचे अनुक्रमे वय एक आणि दोन इतकी आहे. आत्ताच कुठेतरी एक एक शब्द बोलण्यास सुरुवात केली असताना रांगत रांगत चालायला सुरुवात केलेली असताना या दोन्ही चिमुरड्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

More Stories
Pune: मला कुठलीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी मोजायला मी तयार – माजी आमदार रवींद्र धंगेकर
HND जैन बोर्डिंगचे विश्वस्त श्री जयंत नांदुरकर यांना आचार्य श्री गुप्ती नंदीजी यांनी खडेबोल सुनवत खरेदी व्यवहार रद्द करण्यास सांगितले
Pune: जैन बोर्डिंग प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, मुख्यमंत्र्यांनी जैन बोर्डिंगसाठी १०० कोटी जाहीर करावे – धंगेकर