October 27, 2025

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त ‘अटल स्मृती पेन’चे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अनावरण

पुणे, २५ डिसेंबर, २०२४: देशाचे माजी पंतप्रधान, प्रतिभावान कवी आणि दूरदर्शी राजकारणी म्हणून सर्वपरिचित असलेल्या भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधत पुण्यातील व्हीनस ट्रेडर्सच्या वतीने विशेष अशा अटल स्मृती पेनची निर्मिती करण्यात आली आहे. या पेनचा अनावरण समारंभ नुकताच बीएमसीसी शेजारील दादासाहेब दरोडे सभागृहामध्ये संपन्न झाला. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, भारतीय जनता पक्षाचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी आमदार जगदीश मुळीक, व्हिनस ट्रेडर्सचे संचालक सुरेंद्र करमचंदानी यांच्या प्रमुख उपस्थितीत या पेनचे अनावरण संपन्न झाले.

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन म्हणून आम्ही या विशिष्ट पेनची निर्मिती केली असल्याचे सांगत सुरेंद्र करमचंदानी म्हणाले, “सोनेरी रंगाच्या धातूने बनविलेल्या या पेनवर अटल बिहारी वाजपेयी यांचा फोटो असून पेनच्या टोपणावर त्यांचे स्वाक्षरी देखील आहे. या विशिष्ट पेनला रोलरबॉल असलेली व जर्मनीमध्ये निर्मित अशी रीफिल असून यामुळे लिखाण आणखी सोपे होणार असून हा पेन ठेवण्यासाठी आकर्षक असा गिफ्ट बॉक्स देखील मिळणार आहे.”