पुणे, 25 फेब्रुवारी 2025: नेहरूनगर-पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर सुरू होणाऱ्या अस्मिता हॉकी स्टेट लीगमध्ये राज्यातील १६ संघ अव्वल स्थानासाठी भिडतील.
ही स्पर्धा सब-ज्युनियर आणि ज्युनियर अशा दोन कॅटेगरीमध्ये खेळली जाईल. शनिवारी, 1 मार्च 2025 रोजी विशेष प्रदर्शनीय सामन्यासह नियोजित ट्रॉफीच्या अनावरणाने (लॉन्चिंग) स्पर्धेला सुरुवात होईल.
हॉकी इंडिया, भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि हॉकी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा होत असून ज्युनियर मुली आणि सब-ज्युनियर मुलींच्या गटात प्रत्येकी 8 जिल्ह्यांतील संघांचा समावेश आहे. या स्पर्धेच्या तयारीला आयोजकांकडून अंतिम स्वरूप देण्यात येत आहे.
प्रत्येक श्रेणीतील संघ सुरुवातीला राऊंड रॉबिन लीगमध्ये सहभागी होतील. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ बाद फेरीतील उपांत्य फेरीत खेळतील आणि त्यानंतर अंतिम फेरी होईल. ही स्पर्धा 7 मार्चला सुरू होऊन 14 मार्चला संपेल.
स्पर्धेतील दोन्ही विजेत्यांना (सब-ज्युनियर आणि ज्युनियर) रोख पारितोषिके दिली जातील.
“अस्मिता वुमेन्स लीग हा भारतातील महिलांमधील खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी खेलो इंडिया अंतर्गत एक कार्यक्रम आहे,” असे भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे उपसंचालक (युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, एमवायएएस, भारत सरकार), एसएफडब्ल्यू अभिनव शर्मा यांनी स्पष्ट केले.
“भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) आणि हॉकी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने, विविध लीग आयोजित करून क्रीडा क्षेत्रातील महिलांचा सहभाग वाढवणे. तसेच नवीन कलागुणांची ओळख, विद्यमान खेलो इंडिया ऍथलीट्सचे मूल्यमापन आणि महिलांच्या विविध वयोगटातील स्पर्धांच्या श्रेणीतील प्रदर्शनासाठी एक व्यासपीठ म्हणून उपयोग करणे हे लीगचे प्रमुख उद्दिष्ट आहे.”
माजी ऑलिंपियन आणि राज्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू विरुद्ध शालेय मुली यांच्यातील प्रदर्शनीय सामन्याने शनिवारी स्पर्धेची सुरुवात होईल. त्यानंतर अस्मिता ट्रॉफीचे अनावरण होणार आहे.
संघ / गट
सब- ज्युनियर:
अ गट: चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ आणि पुणे.
ब गट: गोंदिया, रायगड, ठाणे आणि मुंबई शहर.
ज्युनियर:
अ गट: औरंगाबाद, मुंबई उपनगर, नाशिक आणि सातारा.
ब गट: जळगाव, कोल्हापूर, सांगली आणि पुणे.

More Stories
गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ ग्रेड 3 कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत कीर्तना रागिनेनी, नाव्या शर्मा, अव्यक्ता रायावरपू, नमित भाटिया, सक्षम भन्साळी यांचे सनसनाटी विजय
एमएसएलटीए – नवसह्याद्री क्रीडा संकूल अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशीप सिरीज(16वर्षाखालील)टेनिस स्पर्धेत रिशीता यादव हिला दुहेरी मुकुटाची संधी
एमएसएलटीए – नवसह्याद्री क्रीडा संकूल अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशीप सिरीज(16वर्षाखालील)टेनिस स्पर्धेत मयंक राजन, रोहन बजाज, रिशीता यादव, स्वरा जावळे यांचा उपांत्य फेरीत प्रवेश