October 26, 2025

महापालिकेवर मोर्चा काढून काँग्रेसने दाखवली एकजूट

पुणे, ४ मार्च २०२५ ः पुणे काँग्रेस अंतर्गट गटबाजूने दुभंगलेली आहे, अशा स्थितीत आज प्रशासक राजवटीत सुविधा मिळत नाहीत म्हणून काँग्रेसने महापालिकेवर मोर्चा काढून एकजूट दाखवली. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील सकारात्मक बदल होत आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यावर संपूर्णपणे राज्यशासनाचे नियंत्रण आहे. महानगरपालिका सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकप्रतिनिधी नसल्यामुळे महानगरपालिकेतील प्रशासन बिघडलेले असून सर्वसामान्य जनतेला सोयी – सुविधा मिळत नाहीत व त्यांना त्रास सहन करावा लागतो. भाजपा व महायुतीच्या मर्जीतले प्रशासन मनमानी कारभार करीत आहे. तसेच दिवसेंदिवस शैक्षणिक, आरोग्य, पाणी, रस्ते व सुरक्षेचा प्रश्न त्याचबरोबर पुण्यातील भाजप नेत्यांच्या आशिर्वादाने महानगरपालिकेत होणारा भ्रष्टाचाराचा प्रश्न भेडसावत आहे, म्हणून या धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव व महाराष्ट्र राज्याचे सहप्रभारी मा. बी. एम. संदिप म्हणाले की, ‘‘सत्तेत येण्या अगोदर ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’ असे मोदी सरकारने जाहिर केले होते. परंतु आता महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देश भ्रष्टाचाराचे कुरण झाला असून भेष्ट व आत्याचारी मंत्र्याच्या विरोधात हे भाजप सरकार कोणत्याही कारवाया करताना दिसत नसल्याचे महाराष्ट्रातील अनेक प्रकरणातून दिसून आले आहे. तीन महिने एका मंत्र्यांचा पुरावे असताना राजीनामा न घेणे तसेच कोर्टाने ताशेरे ओढलेल्या मंत्र्यांस अभय देणे हे त्याचे धोतक असल्याचे बी. एम. संदिप यांनी सांगितले.

या पुढे काँग्रेस पक्ष निवडणुका होवोत अथवा न होवोत जनतेच्या मुलभूत प्रश्नांसाठी या पुढे तीव्र लढा उभारणार व प्रशासनाचा भ्रष्ट कारभार बाहेर काढणार असे प्रतिपादन बी. एम. संदिप यांनी केले.’’

यानंतर शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पुण्यातील ज्वलंत प्रश्नांवरती भाष्य करताना सांगितले की, वाहतुक, पाणी, ड्रेनेज, खड्डे पडलेले रस्ते, निवडणुकी आगोदर लाडकी झालेली बहिण निवडणुकीनंतर तीची पात्रता तपासण्याचे काम या कुचकामी सरकारने केले आहे. तीन ते चार महिन्यांपासून संजय गांधी योजनेतील अंध, अपंग, विधवा, निराधार, ज्येष्ठ नागरिक यांच्या पेन्शन्स गेल्या तीन महिन्यांपासून डीबीटी च्या नावाखाली थांबविण्यचे काम या भाजप सरकारने केले आहे.

यावेळी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी मंत्री रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे, वीरेंद्र किराड, अजित दरेकर, रफिक शेख, लता राजगुरू, वैशाली मराठे, सुजाता शेट्टी, मेहबुब नदाफ, प्राची दुधाने, अनिता धिमधिमे, सुंदर ओव्‍हाळ, राज अंबिके, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, अक्षय जैन, संतोष हंगरगी, सदानंद शेट्टी, नीता रजपूत, सुनिल शिंदे, ब्लॉक अध्यक्ष सुजित यादव, रविंद्र माझिरे, विशाल जाधव, हेमंत राजभोज, संतोष आरडे, रमेश सकट, दिलीप तुपे, रमेश सोनकांबळे, अक्षय माने, संतोष पाटोळे, दिलीप तुपे, समीर शेख, सेल्वराज ॲन्थोनी, अश्विनी डॅनिलय लांडगे, विल्सन चंदवेल, संदिप मोकाटे, सचिन दुर्गाडे, प्रदिप परदेशी, गणेश गुगळे, इरफान शेख, मतीन शेख, द. स. पोळेकर, राजेंद्र शिरसाट, सीमा सावंत, प्रकाश पवार, मंदा जाधव, ज्योती परदेशी, शोभा आरूडे, प्रियंका मधाळे, कविता भागवत, कांचन बालनायक, शारदा वीर, वाल्मिक जगताप, गुलाब नेटके, हरिदास चव्‍हाण, नारायण पोटोळे, रवि आरडे, अविनाश अडसूळ, अनिल धिमधिमे, शिलार रतनगिरी, भगवान कडू, भुषण रानभरे, संदिप कांबळे, ॲड. नंदलाल धिवार, ॲड. रमेश पवळे, किशोर मारणे, मीना हुबळीकर आदींसह असंख्य काँग्रेसजन सदर मोर्चात सहभागी झाले होते.