पुणे, ५ मार्च २०२५ : समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेच्या वतीने पुण्यातील स्वारगेट येथे तीव्र निदर्शने केली असून अबू आझमी यांचा पुतळा जाळत आंदोलन केले आहे. तसेच आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात औरंगजेबाला उत्तम प्रशासकाची उपमा आणि औरंगजेबाची स्तुती करणारी वक्तव्य अबू आझमी यांनी केली आहेत. अशा प्रकारच्या वकत्यावमुळे अबू आझमी यांच्या विरोधात शिवसेनेने स्वारगेट चौकात तीव्र आंदोलन करत त्यांच्या निषेधार्त घोषणाबाजी केली.
यावेळी शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे म्हणाले की, “अबू आझमी याने जे काही वक्तव्य केल आहे ते चुकीचे असून त्याच्यावर लवकरात लवकर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा ही आमची मागणी आहे. तसेच त्याला विधानसभेतून निलंबित केले पाहिजे. आझमी विरोधात पुण्यात देखील गुन्हा दाखल व्हावा यासाठी पुणे शहर पोलिस आयुक्तांना देखील आम्ही याबाबत निवेदन देत आहोत.”

More Stories
Pune: मला कुठलीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी मोजायला मी तयार – माजी आमदार रवींद्र धंगेकर
HND जैन बोर्डिंगचे विश्वस्त श्री जयंत नांदुरकर यांना आचार्य श्री गुप्ती नंदीजी यांनी खडेबोल सुनवत खरेदी व्यवहार रद्द करण्यास सांगितले
Pune: जैन बोर्डिंग प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, मुख्यमंत्र्यांनी जैन बोर्डिंगसाठी १०० कोटी जाहीर करावे – धंगेकर