पुणे, दि. ०६/०३/२०२५: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ९ फेब्रुवारी, २०२५ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (५ वी)आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इ ८ वी) परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची परिषदेच्या www.mscepune.in व https://puppssmsce.in या संकेतस्थळावर माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
अंतरिम उत्तरसूचीमध्ये आक्षेप असल्यास त्याबाबत परिषदेच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन स्वरुपात ११ मार्च २०२५ पर्यंत अर्ज करता येईल.ऑनलाईन निवेदन पालकांकरीता संकेतस्थळावर व शाळांकरीता त्यांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. विहित मुदतीत प्राप्त व ऑनलाईन निवेदनांचाच विचार केला जाईल. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषय तज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तर सूची परिषदेच्या यथावकाश संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन आवेदनपत्रातील माहितीत व शाळा माहिती प्रपत्रात विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडीलांचे नाव, आईचे नाव, लिंग, जन्मतारीख, जात प्रवर्ग, शाळेचा अभ्यासक्रम व शाळेचे क्षेत्र इत्यादी दुरुस्ती करण्यासाठी दिनांक ११ मार्चपर्यंत शाळांच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे, असेही श्री. राठोड यांनी कळविले आहे.
More Stories
पुण्यात प्राण्यांवरील अत्याचाराविरोधात जोरदार मोर्चा
“जैन धर्माच्या पवित्र जागेचा सौदा – ट्रस्टकडून बिल्डरच्या घशात जमीन घालण्याचा डाव!”
Pune: उंड्रीमध्ये एका सदनिकेत आगीची घटना; एक मृत तर पाच जखमी