पुणे, ०३ एप्रिल २०२५: पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्यावतीने मार्च महिन्यात आयोजित जनता दरबारात नागरिकांकडून प्राप्त एकूण 13 प्रकरणापैकी 11 प्रकरणे निकाली काढण्यात आले तर उर्वरित 2 प्रकरणावर कार्यवाही सुरु आहे.
म्हाडा प्राधिकरणाचे उपाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली 9 जानेवारी 2025 रोजी झालेल्या विभागीय मंडळाच्या बैठकीत नागरिकांच्या प्रश्न तत्परतेने सोडविण्याकरिता लोकशाही दिनाच्या धर्तीवर प्रत्येक महिन्याच्या दुस-या व चौथ्या गुरुवारी जनता दरबार आयोजित करण्याबाबत निर्देश देण्यात आले, त्यानुसार हा जनता दरबार घेण्यात आला आहे, अशी माहिती पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.

More Stories
HND जैन बोर्डिंगचे विश्वस्त श्री जयंत नांदुरकर यांना आचार्य श्री गुप्ती नंदीजी यांनी खडेबोल सुनवत खरेदी व्यवहार रद्द करण्यास सांगितले
Pune: जैन बोर्डिंग प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, मुख्यमंत्र्यांनी जैन बोर्डिंगसाठी १०० कोटी जाहीर करावे – धंगेकर
Pune: मेधा ताई तुमच्या बापाचा शनिवारवाडा नाही – रुपाली ठोंबरे पाटील