October 24, 2025

लहान मुलांनी घेतला आंबा खाण्याचा आस्वाद…लहान चिमुकल्यांनी मारला आंब्यावर ताव…

पुणे, १२ एप्रिल २०२५: फळांचा राजा अशी ओळख असलेल आणि उन्हाळ्यात लहान पासून सर्वच व्यक्ती ज्या फळाची आतुरतेने वाट पाहत असतात त्या आंब्यावर आज लहान चिमुकल्यांनी ताव मारत दोन मिनिटात प्लेट मध्ये असलेले सर्वच आंबे मुलानी संपवले आणि मीच पाहिलं मीच पाहिलं म्हणायले निमित्त होते पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित आंबे खा स्पर्धेच….

महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे “महाराष्ट्र माझा आंबा महोत्सव” येथे लहान मुलां मुलीं साठी भारतातील लोकप्रिय ” आंबे खा स्पर्धा ” आयोजित करण्यात आली होती.यावेळी या स्पर्धेत जवळपास ३० हून अधिक मुलानी सहभाग घेत आंब्यावर ताव मारला.

यावेळी आयोजक रवी सहाणे म्हणाले की गेल्या १६ वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंबे खा स्पर्धेच आयोजन केलं जात आहे.यात लहान मुलांना मनसोक्त आंबे खाण्याची स्पर्धा आयोजित केली जात आहे.यंदा देखील ३० हून अधिक मुलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला यावेळी विजेता मुलाला आंब्याची पेटी बक्षीस देण्यात आली आहे.

यावेळी या आंबे खा स्पर्धेत लहान मुलांनी आंबे बघून आनंदी होत आंब्यावर ताव मारला आणि दोन मिनिटाच्या आतच प्लेटमध्ये असलेले आंबे संपवले.आम्हाला खूपच जास्त आनंद होत आहे की आम्ही आज मनसोक्तपणे आंबे खाल्ले आहे या दिवसाची आम्ही खूप वाट बघत होतो असं यावेळी या लहान मुलांनी सांगितलं.