दुचाकी बाजूला घेण्यास सांगितल्यावरून कार चालकाला बेदम मारहाण

पुणे, २८ ऑगस्ट २०२२: रस्त्यावर पार्क केलेल्या दुचाकी बाजूला घेण्यास सांगितल्याच्या रागातून पाच जणांनी कार चालकाला लोखंडी रॉडने व कोयत्याने मारहाण केल्याची घटना कात्रज परिसरात घडली. याप्रकरणी भारती विद्यापीट पोलीस ठाण्यात प्रितम परदेशी (वय २६) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार रात्री पावणे आकराच्या सुमारास भैरवनाथ मंदिराजवळ घडला आहे. तक्रारदार हे त्यांची कार घेऊन घरी निघाले होते. परंतु, मंदिराच्या परिसरात आल्यानंतर रस्त्यावरच दुचाकी उभा केलेल्या होत्या. त्यामुळे त्यानी दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले. त्यावरून वाद झाला आणि पाच जणांनी त्यांना बेदम मारहाण केली.