पुणे, १६/०४/२०२३: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात बेकायदा रॅपगीत चित्रीकरण केल्या प्रकरणी एका तरुणाच्या विरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रॅपगीतात तरुणाने तलवार, रिव्हॅाल्वर तसेच अश्लील शब्दांचा वापर केल्याचे उघडकीस आल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाकडून पोलिसांकडे तक्रार अर्ज देण्यात आला होता.
शुभम आनंद जाधव (वय २४, रा. भगवती आशियाना सोसायटी, जयभवानीनगर, पाषाण) असे गुन्हा दाखल केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत विद्यापीठ सुरक्षा विभागाचे सहायक अधिकारी सुधीर दळवी (वय ५०) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विद्यापीठाच्या आवारात जाधव याने बेकायदा रॅपगीत चित्रीत केले होताे. रॅपगीतात अश्लील शब्द होते. संबंधित रॅपगीत ध्वनीचित्रफित समाजमाध्यमावर १८ मार्च रोजी ‘राॅकसन सल्तनत’ या मथळ्याखाली प्रसारित करण्यात आली होती.
विद्यापीठाच्या आवारात बेकायदा चित्रीकरण तसेच अश्लील शब्दांचा वापर केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर दळवी यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर या प्रकरणी रॅपगीत गायक शुभम जाधव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण तपास करत आहेत.
More Stories
महापालिकेची अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम; ५००० चौ.फुट बांधकाम जमीनदोस्त
Pune: प्रभाग रचनेवरून सुनावणीमध्ये गोंधळ
चांदणी चौक ते जांभुळ वाडी, जैन वसतिगृह बकोरी फाटा ते बकोरी या रस्त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल महिनाभरात तयार करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार