दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेला एकाला कोरोनाची लागण, ‘ओमायक्रॉन’चा विषाणु आहे की नाही तपासणीसाठी स्वॉब एनआयव्हीकडे पाठविले

पुणे, 30/11/2021: पुण्यात काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतून एक नागरिक आला आहे. महापालिकेने त्याची आरटीपीसीआर चाचणी केली असून, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे . त्यामध्ये ओमायक्रॉन हा नवा विषाणू आहे की नाही हे तपासण्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंग करावे लागणार असुन त्यासाठी एनआयव्हीकडे स्वॉब पाठविले आहे .

जगभरात चिंतेचं वातावरण निर्माण करणा-्या ‘ओमिक्रॉन’ या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या पाश्र्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. त्यातच कोरोनाकाळात सर्वाधिक संसर्गबाधित असलेल्या पुणे शहरात आता दक्षिण अफ्रिकेतून आलेल्या एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे
. त्या व्यक्तीमध्ये ओमायक्रॉन हा नवा विषाणू आहे की नाही हे तपासण्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंग करावे लागणार असुन त्यासाठी एनआयव्हीकडे स्वॉब पाठविले आहे . मात्र या व्यक्तीच्या घरातील अन्य तीन सदस्याचे कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत अशी माहिती आरोग्यप्रमुख डॉ आशीष भारती आणि सहाय्यक आरोग्यप्रमुख डॉ .सजीव वावरे यांनी दिली . कोरोनाच्या नव्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी महापालिका सज्ज आहे. आफ्रिका, ऑस्ट्रिया, जर्मनी, झिम्बाब्वे या देशातून नागरिक पुण्यात आल्यास त्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाकडून घेण्यात येईल. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अशा नागरिकांना लक्षणे नसली तरी त्यांची आरटीपीसीआर तपासणी केली जाणार आहे असेही डॉ सजीव वावरे यांनी सांगितले .