तरूणीच्या होणाऱ्या पतीला फोनकरून थेट जीवे मारण्याची धमकी 

पुणे, २५ ऑगस्ट २०२२: खासगी क्लासच्या शिक्षकाचे अन् एका विद्यार्थीनीचे स्वमर्जीने प्रेम संबंध जुळले खरे, पण काही दिवसांतच तिचा कुटूंबाने दुसऱ्या मुलाशी विवाह ठरविला. त्यानंतर मात्र या शिक्षकाचा पारा चडला अन त्याने काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरूणीच्या होणाऱ्या पतीला फोनकरून थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

 

याप्रकरणी पोलिसांनी नितीन सुडके उर्फ हर्षवर्धन लक्ष्मण पाटील (वय २८, रा. गौरीशंकर सोसायटी, हिंगणे खुर्द) या शिक्षकाला अटक केली आहे. याबाबत २१ वर्षीय तरुणीने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन याची गणतीचा खासगी क्लास आहे. तक्रारदार तरुणी गणत शिकण्यासाठी नितीन याच्या क्लाससाठी जात होती. यावेळी त्यांच्यात स्वमर्जीने प्रेम संबंध जुळले होते. दोघांमध्ये प्रेम जुळल्यानंतर काही दिवसांनी तरूणीच्या कुटूंबाने तिचा विवाह दुसऱ्या एका मुलाशी ठरविला. ही बाब नितीनला समजली. तरुणीने देखील तिला विवाह ठरल्याचे सांगत त्याला आता प्रेम संबंध न ठेवण्याबाबत सांगितले. मात्र, तरीही नितीनने त्या दोघांचे काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तर, तिचा हात धरून तिच्या मन्नात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्यकरून तिचा विनयभंग केला.