पुणे, २२ ऑगस्ट २०२५ : सिंहगड रोड परिसरात आरोग्यसेवेच्या सुविधेत भर घालत अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या डॉ. दूधभाते नेत्रालय व रेटीना सेंटरचे उद्घाटन येत्या रविवारी, २४ ऑगस्ट २०२५ रोजी होणार आहे. माणिकबाग पेट्रोल पंपाशेजारील गल्लीमध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या या नेत्ररुग्णालयाचा भव्य सोहळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे.
या प्रसंगी महिला आयोग अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर, राष्ट्रवादीचे माजी नेते काका चव्हाण, चेतनजी तुपे तसेच वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पाठारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. अनिल दूधभाते यांच्या मार्गदर्शनाखाली हे केंद्र उभारण्यात आले असून डोळ्याच्या विविध विकारांचे निदान व उपचार एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याची सुविधा येथे आहे. पुणे शहरासह ग्रामीण भागातूनही मोठ्या प्रमाणावर रुग्ण उपचारासाठी येथे दाखल होतात. रुग्णांशी सहानुभूतीपूर्ण वर्तन आणि अत्याधुनिक उपचार पद्धतीमुळे या रुग्णालयाने विशेष विश्वास संपादन केला आहे. डॉ. दूधभाते यांना यापूर्वी विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले असून नेत्रसेवेसाठी त्यांचे योगदान लक्षणीय मानले जाते. या रुग्णालयामुळे सिंहगड रोड परिसरासह पुणेकरांना उच्च दर्जाची आरोग्यसेवा मिळणार असल्याची अपेक्षा आहे.

More Stories
Pune: मला कुठलीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी मोजायला मी तयार – माजी आमदार रवींद्र धंगेकर
HND जैन बोर्डिंगचे विश्वस्त श्री जयंत नांदुरकर यांना आचार्य श्री गुप्ती नंदीजी यांनी खडेबोल सुनवत खरेदी व्यवहार रद्द करण्यास सांगितले
Pune: जैन बोर्डिंग प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, मुख्यमंत्र्यांनी जैन बोर्डिंगसाठी १०० कोटी जाहीर करावे – धंगेकर