पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले

पुणे, ११ जून २०२१: पीएमपीएमएल च्या कात्रज आगारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त दि. १० जून २०२१ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका अश्विनीताई नितीन कदम यांच्या सहकार्याने हे आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.

या शिबीरामध्ये कामगारांचे हेल्थ केअर, फिजीक रेटिंग, ब्लड प्रेशर, बॉडी टेम्प्रेचर, शुगर अशा एकूण २३ प्रकारच्या तपासण्या एकाच वेळी केल्या जात आहेत. सदर शिबिराच्या माध्यमातून दि. १० जून २०२१ ते १२ जून २०२१ या तीन दिवसांच्या कालावधीत कात्रज आगारातील सर्व कर्मचाऱ्यांच्या मोफत आरोग्य तपासण्या केल्या जाणार आहेत.

सदर आरोग्य तपासणी शिबीरास पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.राजेंद्र जगताप यांनी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले. याप्रसंगी पीएमपीएमएलच्या भव्य रक्तदान शिबिरात रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना डॉ. राजेंद्र जगताप व अश्विनीताई कदम यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

या शिबिराच्या उदघाटन प्रसंगी धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त प्रज्ञा पोतदार,पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक युवराज बेलदरे, सामाजिक कार्यकर्ते नितीनभाऊ कदम उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम मोरे यांनी केले. आगार व्यवस्थापक विजय रांजणे यांनी आभार मानले.