पुणे, २३ जुलै २०२४: शोध इकोचे २५ जुलै २०२४ रोजी पुण्यामध्ये पुणे मेट्रो प्रकल्पावर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमासाठी आयएएस आणि महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असणार आहेत.
कार्यक्रम हा येत्या गुरुवारी अंतर्नाद योग्य केंद्र, कोथरूड येथे संध्याकाळी ६.१५ ते ८ या वेळेत होणार आहे. कार्यक्रम हा सर्वांसाठी खुला असून त्यामध्ये प्रवेश हा विनामूल्य आहे.
२६ जानेवारी २०२४ रोजी स्थापन झालेली शोध इको ही एक सार्वजनिक धोरण, अर्थशास्त्र आणि भूराजनीती याविषयी जनजागृती करणारी संस्था आहे. शोध इको हे साप्ताहिक शोधनिबंध आणि लेख तयार करणारी संस्था आहे आणि प्रत्येक महिन्याला बैठकी आणि व्याख्याने आयोजित करतात. प्रत्येक कार्यक्रमध्ये विशेष तज्ञ असतात जे विविध सरकारी धोरणांवर चर्चा करतात आणि लोकांशी संवाद साधतात.
शोध इको हर्षदा अभ्यंकर आणि हृषीकेश मुळे यांनी सर्वाना या माहितीपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी विनंती केली आहे. अतिरिक्त माहितीसाठी शोध इकोच्या shodh.eco@gmail.com या ईमेल वर साधावा असे सुद्धा कारकरांच्या आयोजकांनी सांगितले आहे.
More Stories
Pune: सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाला ‘प्रतिपंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी उड्डाणपूल’ असे नाव द्यावे
धानोरी-चऱ्होली डी.पी. रस्त्यास वनविभागाची मंजुरी; आमदार बापूसाहेब पठारे यांच्या प्रयत्नांना यश
पालकांनी आपली मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत घालावीत- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार