भरदिवसा महिलेचे दीड लाखांचे मंगळसूत्र हिसकाविले

पुणे, दि. १९/०१/२०२३ –  रस्त्याने चाललेल्या महिलेचा पाठलाग करून दुचाकीस्वार चोरट्याने १ लाख ६० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना १८ जानेवारीला दुपारी साडेतीनच्या सुमारास पाषाण परिसरातील सोमेश्वरवाडीत घडली. याप्रकरणी महिलेने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
फिर्यादी महिला १८ जानेवारीला दुपारी साडेतीनच्या सुमारास पायी चालल्या होत्या. त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्याने महिलेच्या गळ्यातील १ लाख ६० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. महिलेने आरडओरड करेपर्यंत चोरटा पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक नीलेशकुमार महाडिक तपास करीत आहेत.