पुणे, २९/०५/२०२३: अल्पवयीन मुलीला केरला स्टोरी चित्रपट दाखविण्याच्या बहाण्या.ने अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी एकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सनी कृपाशंकर गुप्ता (वय २९, रा. जलप्रभात झोपडपट्टी संघ, घाटकोपर, मुंबई) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत पीडीत मुलीच्या आईने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी गुप्ता पीडीत मुलीच्या ओळखीचा आहे. तो पीडीत मुलीच्या घराशेजारी भाड्याने खोलीने घेऊन राहत आहे. त्याने मुलीला केरला स्टोरीज चित्रपट दाखवितो, अशी बतावणी केली. त्यानंतर गुप्ता मुलीला त्याच्या घरात घेऊन गेला.
गुप्ता याने मुलीला पाचशे रुपये देऊन तिच्याशी अश्लील वर्तन केले. त्यानंतर घाबरलेल्या मुलीने या घटनेची माहिती आईला दिली. त्यानंतर या प्रकरणात गुप्ता याच्या विरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

More Stories
सूर महती महोत्सवात रसिकांनी अनुभविली गायन, वादन आणि नृत्यप्रस्तुतीची अनुभूती
नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता २ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
Pune: शहरात ३० नोव्हेंबर रोजी ‘नदी महोत्सव’ साजरा होणार