कात्रज चौकात पादचारी महिलेला लुटले

पुणे, 03 नोव्हेंबर 2022 – रस्त्याने पायी चाललेल्या महिलेचा पाठलाग करून दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेकडील १४ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना २ नोव्हेंबरला सकाळी सहाच्या सुमारास कात्रज चौकात घडली. याप्रकरणी ३७ वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

फिर्यादी महिला २ नोव्हेंबरला सकाळी सहाच्या सुमारास कात्रज चौकातून पायी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांना धमकावून घड्याळ, सोन्याचे दागिने, महत्वाची कागदपत्रे असा १४ हजारांचा ऐवज चोरून नेला. महिलेने आरडाओरड करेपर्यंत दुचाकीस्वार चोरटे पसार झाले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ तपास करीत आहेत.