राजगुरूनगर, ता. ११ ऑगस्ट : पाईट येथील कुंडेश्वर देवदर्शनासाठी निघालेल्या पिकअप वाहनाचा भीषण अपघात होऊन सात महिलांचा मृत्यू झाला असून ३५ हून अधिक महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
श्रावणी सोमवारनिमित्त खेड तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने कुंडेश्वर येथे दर्शनासाठी येतात. आज सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास महिलांनी खच्चून भरलेले पिकअप वाहन रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने तब्बल पाच ते सहा वेळा पलटी झाले. अपघात इतका भीषण होता की अनेक महिलांना गंभीर दुखापती झाल्या.
घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. खाजगी वाहनांसह १० हून अधिक ॲम्ब्युलन्सद्वारे जखमींना तातडीने जवळील रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारापूर्वीच सात महिलांचा मृत्यू झाला. ३५ हून अधिक जखमींवर उपचार सुरू असून काहींची प्रकृती गंभीर आहे.
अपघात अत्यंत गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती पाईटचे माजी सरपंच जयसिंग दरेकर यांनी दिली. सध्या घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे.

More Stories
Pune: मला कुठलीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी मोजायला मी तयार – माजी आमदार रवींद्र धंगेकर
HND जैन बोर्डिंगचे विश्वस्त श्री जयंत नांदुरकर यांना आचार्य श्री गुप्ती नंदीजी यांनी खडेबोल सुनवत खरेदी व्यवहार रद्द करण्यास सांगितले
Pune: जैन बोर्डिंग प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, मुख्यमंत्र्यांनी जैन बोर्डिंगसाठी १०० कोटी जाहीर करावे – धंगेकर