पुणे, दि.12 नोव्हेंबर 2025- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित दुसऱ्या पीवायसी टेबलटेनिस साखळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यात सिद्धार्थ देशमुख(3600पॉईंट्स,एस कॅप्स वॉरियर्स), मिहीर ठोंबरे(3250पॉईंट्स,आयसिनर्जी स्कॉर्चर्स), राहुल पाठक(3250पॉईंट्स,एन+1 ऍस्पिरंटस), आशिष बोडस(3000पॉईंट्स, बीएफ फिनिशर्स) हे खेळाडू महागडे ठरले आहेत. ही स्पर्धा 14 ते 16 नोव्हेंबर 2025 या कालावधीत पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या कम्युनिटी हॉलमध्ये होणार आहे.
स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, सह सचिव सारंग लागू आणि टेबल टेनिस विभागाचे सचिव तन्मय आगाशे यांनी सांगितले की, स्पर्धेचे हे सलग दुसरे वर्ष असून यावर्षी देखील सभासदांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. स्पर्धेत 104 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धकांची निवड लिलाव पध्दतीने एकूण 6 संघांमध्ये विभागणी करण्यात आली आहे.
या स्पर्धेच्या पहिला मालिकेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धेचे आयोजन करताना आम्हाला खूप आनंद झाला आहे. कारण या स्पर्धेद्वारे खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी आम्ही एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊ शकलो असे सारंग लागू यांनी सांगितले.
स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक पारितोषिक देण्यात येणार असल्याचे क्लबच्या टेबल टेनिस विभागाचे सचिव तन्मय आगाशे यांनी सांगितले. नंदन डोंगरे स्पर्धा संचालक म्हणून काम पाहतील.
स्पर्धेतील प्रत्येक स्पर्धकाला खेळता यावे अशा पध्दतीने स्पर्धेचे स्वरूप करण्यात आले आहे. महिला व लहान मुलांचा जास्तीत जास्त सहभाग होण्यावर आमचा भर होता. हि स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने खेळविण्यात येणार असून साखळी सामन्यांमध्ये प्रत्येक संघ एकमेकांशी सामना खेळणार आहे. एका टाय मध्ये गोल्ड ओपन दुहेरी, खुला एकेरी, खुला दुहेरी, खुला एकेरी आणि खुला दुहेरी असे एकूण पाच सामने होणार आहेत.
स्पर्धेतील सहा संघांतील खेळाडूंची निवड हि लिलावपद्धतीने करण्यात आली आहे. या संघांमध्ये एस कॅप्स वॉरियर्स, बेल्फीन्स टायगर्स, बीएस फिनिशर्स, आयसिनर्जी स्कॉर्चर्स, एन+1 ऍस्पिरंटस, वाडेश्वर विझार्डस हे 6 संघ झुंजणार असल्याचे ताम्हाणे यांनी नमुद केले.
स्पर्धेसाठी विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे, यामध्ये तन्मय आगाशे, सारंग लागु, अभिषेक ताम्हाणे, नंदन डोंगरे, अतुल ठोंबरे, कौस्तुभ वाळिंबे व दिपेश अभ्यंकर यांचा समावेश आहे.

More Stories
दुसऱ्या पीवायसी कासाग्रँड टेबलटेनिस साखळी स्पर्धेत एनप्लसवन ऍस्पिरंटस, वाडेश्वर विझार्ड्स संघांची विजयी सलामी
20व्या रमेश देसाई मेमोरियल 16 वर्षांखालील ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत वरद पोळचा मानांकित खेळाडूवर विजय
44 व्या पीएसपीबी आंतर युनिट लॉन टेनिस स्पर्धेत दिविज शरण, प्रतीक शेरॉन, अपूर्व जैसवाल, प्रार्थना ठोंबरे, सोहिनी मोहंती यांची विजयी सुरुवात