एमएसएलटीए-पीएमडीटीए अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीज 12वर्षांखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत देशभरांतून एकूण 161 खेळाडू सहभागी

पुणे, 28 सप्टेंबर, 2022: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या वतीने आयोजित व एमएसएलटीए, एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असेलल्या एमएसएलटीए-पीएमडीटीए अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीज 12वर्षांखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत देशभरांतून एकूण 161 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा एमएसएलटीए टेनिस कॉम्प्लेक्स, म्हाळुंगे बालेवाडी येथे दि.1 ते 7  ऑक्टोबर 2022 या कालावधीत होणार आहे.
याविषयी अधिक माहिती देताना स्पर्धेचे संचालक गौरव चतुर यांनी सांगितले की, स्पर्धेत पंजाब, राजस्थान, गुजरात, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, सिक्कीम आणि महाराष्ट्र या ठिकाणांहून प्रवेशिका आल्या आहेत. स्पर्धेला ड्रीम्स रिडेव्हलप, ट्रिलिश कॉफी आणि रँड पॉलीप्रॉडक्ट्स यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.
स्पर्धेत विवान म्रिधा, तनिष्का चोप्रा, ईशल पठाण, स्वरा जावळे, स्वानिका रॉय, प्रज्ञेश शेळके, शौनक सुवर्णा, स्मित उंद्रे, ध्रुव सेहगल, जय गायकवाड, सृष्टी किरण, कार्थिका पद्मकुमार, भार्गवी शर्मा हे मानांकित खेळाडू मुख्य झुंजणार आहेत. स्पर्धेची पात्रता फेरी शनिवार, 1 ऑक्टोबर व रविवार, 2ऑक्टोबर रोजी होणार असून मुख्य फेरीस सोमवार, 3 ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे.
स्पर्धेतील विजेत्या, उपविजेत्या खेळाडूंना करंडक, प्रशस्तिपत्रक आणि एआयटीए गुण अशी पारितोषिक देण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी आयटीएफ व्हाईट बॅच रेफ्री वैशाली शेकटकर यांची सुपरवायझर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. स्पर्धेचे उदघाटन सोमवार 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता प्रमुख पाहुणे एमसीसीआयएचे महासंचालक प्रशांत गिरबाने, अमित परांजपे आणि अमित भार्गवा यांच्या हस्ते होणार आहे.