December 2, 2025

तिसऱ्या मिलेनियम नॅशनल स्कुल व कुंटे चेस अकादमी पुरस्कृत विविध वयोगटातील खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत एकुण 215 खेळाडू सहभागी

पुणे, 23 डिसेंबर, 2023: कुंटे चेस अकादमी आणि मिलेनियम नॅशनल स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने व किंडर स्पोर्ट्स एलएलपी यांच्या सहकार्याने आयोजित तिसऱ्या मिलेनियम नॅशनल स्कुल व कुंटे चेस अकादमी पुरस्कृत विविध वयोगटातील खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत जिल्ह्यातून एकुण 215 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा मिलेनियम स्कुल, कर्वेनगर येथे रविवार, 24 डिसेंबर 2023 रोजी होणार आहे.

स्पर्धेच्या संचालिका मृणालिनी कुंटे यांनी सांगितले की, हि स्पर्धा पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल यांच्या मान्यतेखाली होत आहे. तसेच, हि स्पर्धा स्विस लीग पद्धतीने सात फेऱ्यांमध्ये खेळविण्यात येणार आहे. पुण्यात बुद्धिबळ खेळाचा प्रसार व्हावा याहेतूने मिलेनियम स्कुलने या स्पर्धेसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

स्पर्धेत 215 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा चार गटात होणार असून यामध्ये गौरव बकलीवाल(2144), आर्यन करमलकर(1512), सुनील वैद्य(1454), शौर्य घेलानी(1161), निवान अगरवाल(1078), विहान देशमुख(1223), सम्यक कुलकर्णी(1190) यांचा समावेश आहे. हि स्पर्धा अ गटात (रेटेड गट), ब गटात (अनरेटेड गट), क गटात(8 वर्षाखालील) आणि ड गटात( 10 वर्षाखालील गट)अशा गटात ही स्पर्धा पार पडणार आहे. स्पर्धेत एकूण 32000/-रुपयांची पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी दिप्ती शिदोरे हे चीफ आरबीटर म्हणून काम पाहणार आहेत.