एमएसएलटीए ओम दळवी मेमोरियल एआयटीए 12वर्षाखालील चॅम्पियनशीप सिरीज टेनिस स्पर्धेत आरव छल्लानी, अधिराज दुधाने यांचे सनसनाटी विजय

पुणे, 29 नोव्हेंबर, 2022: ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित एमएसएलटीए ओम दळवी मेमोरियल एआयटीए 12 वर्षाखालील चॅम्पियनशीप सिरीज टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात आरव छल्लानी, अधिराज दुधाने या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत आगेकूच केली.

महाराष्ट्र पोलीस टेनिस कोर्ट, औंध येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात दुसऱ्या फेरीत बिगरमानांकीत आरव छल्लानी याने अव्वल मानांकित तेलंगणाच्या ईशान सोहनीचा 6-3, 6-3 असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. पुण्याच्या अधिराज दुधाणे याने दुसऱ्या मानांकित क्रिशय तावडेचा 6-2, 7-5 असा पराभव करून आगेकूच केली. आठव्या मानांकित त्रिशिक वाकलकर याने शौर्य बोऱ्हाडेचा 6-1, 6-0 असा तर, तिसऱ्या मानांकित
सर्वज्ञ सरोदेने अंशुल पुजारीचा 6-2, 6-4 असा पराभव केला.

मुलींच्या गटात जान्हवी चौगुले, सान्वी राजू, शिबानी गुप्ते, मायरा टोपणो, श्रावि देवरे, वीरा हरपुडे, ऐश्वर्या स्वामीनाथन या खेळाडूंनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ: दुसरी फेरी: मुले:
आरव छल्लानी(महा)वि.वि.ईशान सोहनी(तेलंगणा)[1] 6-3, 6-3;
अनिश वडनेरकर(महा)वि.वि.विश्वास चंद्रशेखर(महा)6-1, 6-4;
कियान पटेल (महा) वि.वि.नील बोंद्रे(महा)6-2, 6-2;
शौर्य गडदे(महा)[5]वि.वि. कबीर गुंडेचा(महा) 6-1, 6-4;
त्रिशिक वाकलकर(महा)[8] वि.वि.शौर्य बोऱ्हाडे(महा) 6-1, 6-0;
सर्वज्ञ सरोदे(महा)[3]वि.वि.अंशुल पुजारी(महा) 6-2, 6-4;
वीर चतुर(महा)[6]वि.वि.सय्यम पाटील(महा)6-7(6), 6-3 सामना सोडून दिला;
अधिराज दुधाणे(महा)वि.वि.क्रिशय तावडे(महा)[2] 6-2, 7-5;

मुली:
जान्हवी चौगुले(महा)[1]वि.वि.अहाना पाटील(महा)6-2, 6-1;
सान्वी राजू(महा)[2]वि.वि.समिका खन्ना(महा)6-2, 6-2;
शिबानी गुप्ते(महा)[3] वि.वि.आयुश्री तरंगे(महा)6-0, 6-1;
मायरा टोपणो(महा)[6] वि.वि.मनस्वी राठोड(महा)6-0, 6-0;
श्रावि देवरे(महा)[4]वि.वि.अवनी देसाई(महा) 6-0, 6-1;
वीरा हरपुडे(महा)[5]वि.वि.मायरा शेख(महा)6-0, 6-0;
ऐश्वर्या स्वामीनाथन(महा)[2] वि.वि.नक्षत्रा अय्यर(महा)6-3, 6-3.