पुणे: एमआयटी विद्यापीठ विरोधात आंदोलन करणार्या अभाविच्या कार्यकर्त्यांना अटक 

पुणे, २२/०६/२०२१: एमआयटी विद्यापीठ विद्यार्थ्यांकडून ‘इंटरनॅशनल स्टडी टूर’ (IST) च्या नावाने लाखो रुपये घेतलेले आहे, तरी कोरोना आजारामुळे विद्यार्थ्यांना परदेशात जात येणार नाही त्यामुळे हे पैसे तात्काळ परत करावे यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे (अभाविप) आज विमान उडाओ आंदोलन ‘ करण्यात आले. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना तब्यात घेतले.

 एमआयटी विद्यापीठाने इंटरनॅशनल स्टडी टूर (IST) आयोजित करते, यासाठी विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये घेतले जातात. परंतु, २०१९-२०२० या बॅचच्या विद्यार्थ्यांचा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आंतरराष्ट्रीय दौरा झाला नाही. मात्र, विद्यार्थ्यांकडून त्याची संपूर्ण शुल्क आकारण्यात आली आहे.

अशा काळात विद्यार्थ्यांना त्यांची महाविद्यालयीन शुल्क भरणे अवघड वाटत आहे, आणि त्यात आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्याच्या नावाने विद्यार्थ्यांची लुट करणे हे कितपत योग्य? असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. अभाविपने प्रशासनासोबत चर्चा केली त्यावेळी सांगण्यात आले की पुढील ३ वर्षांनतंर आम्ही विद्यार्थ्यांना परदेशात घेऊन जावू पण त्यावेळी विद्यार्थी कुठेतरी नोकरी करत असेल व्यवसाय करत असेल तो का जाईल? तसेच प्रमाणपत्र गृहीत अभ्यासक्रम देऊ परंतु २ लाख घेऊन असा कोणताच नवीन कोर्स आम्हाला नको अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

यामुळे ” कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एमआयटी ची ‘इंटरनेशनल स्टडी टूर’ झाली नसताना, विद्यापीठाने लाखो रुपयांची शुल्क घेतलेली आहे, प्रशासनाने संपूर्ण अभ्यास दौरा शुल्क त्वरित परत करावे अन्यथा याहून ही अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल ” अशी मागणी अभाविप महानगर मंत्री शुभम भुतकर यांनी केली.

वैतागलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे परत मिळवून देण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला अखेर आंदोलनाचा मार्ग निवडावा लागला. आज दिनांक २२ जून २०२० रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पुणे कडूनMIT-WP एमआयटी -डब्लूपीयू येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. मात्र विद्यार्थ्यांच्या हक्काच्या या आंदोलनात प्रदेश सह मंत्री अनिल ठोंबरे, पुणे महानगर मंत्री शुभम भुतकर यांच्या सह २० कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.

याबाबत एमआयटी खुलासा केला आहे

एमआयटी डब्ल्यूपीयू प्रशासनाचे स्पष्टीकरण दिले आहे. एमआईटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या बीटेक (फायनल ईयर) २०२०-२१ च्या विद्यार्थ्यांना आम्ही ३ पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्या पैकी पहिला पर्याय म्हणजे आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरा (विद्यार्थी पुढील तीन वर्षात कधीही जाऊ शकेल). दुसरा पर्याय नामांकीत परदेशी विद्यापीठातील ऑनलाइन कोर्सेस आणि तिसरा पर्याय म्हणजे वरिल दोन्ही पर्याय मान्य नसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे पैसे परत करण्यात येईल. विद्यापीठाच्या प्रशासनाने हा निर्णय २० दिवसांपूर्वीच घेतला होता. असे माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या इंजीनियरिंग विभागाचे अधिष्ठाता प्रा.डॉ. प्रसाद खांडेकर यांनी दिली.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या बीटेक विद्यार्थ्यांना तीन पर्याय उपलब्ध करून दिल्या नंतर हे प्रकरण संपूर्णपणे बंद झाले होते. असे असून देखील अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी एमआयटी डब्ल्यूपीयूला नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. विशेष म्हणजे या आंदोलनामध्ये विद्यापीठाच्या अभियांत्रिकी शाखेचा एक ही विद्यार्थी सहभागी झाला नव्हता, असे खांडेकर यांनी स्पष्ट केले.