December 11, 2025

HND जैन बोर्डिंगचे विश्वस्त श्री जयंत नांदुरकर यांना आचार्य श्री गुप्ती नंदीजी यांनी खडेबोल सुनवत खरेदी व्यवहार रद्द करण्यास सांगितले

पुणे, २५/१०/२०२५: HND जैन बोर्डिंगचे विश्वस्त श्री जयंत नांदुरकर यांना घेराव घातला. दरम्यान जैन मुनी आचार्य श्री गुप्ती नंदीजी यांनी ट्रस्टी जयंत नांदुरकर यांना खडे बोल सुनावले. जैन बोर्डिंग चे मंदिराची जागा विक्री मध्ये सहभागी असलेले शासक, प्रशासक तसेच या कारस्थानात सहभागी असलेल्या सर्वांचा विनाश होईल असा शाप देखील दिला.

आचार्य श्री गुप्ती नंदीजी म्हणाले, ट्रस्टच्या कागदपत्रातून मंदिर गायब करण्यात आले. असे कोणता विकास साद्य करण्याचे आपण प्रयत्न करीत आहात की तुम्हाला धर्माचा नाश करायचा आहे. तुम्ही मंदिर विकले. हे ट्रस्टचे कर्तव्य आहेत का? ज्या व्यक्तीने जागा दान दिली ती विकण्याचा अधिकार आपल्याला आहे का? ज्या व्यक्तीने ही जागा धर्मकार्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिली आहे त्याने स्पष्ट लिहिले आहे की ही जागा विक्री करता येणार नाही. असे असताना देखील ट्रस्टी विक्री कसे करू शकतात.

एक तारखेच्या अगोदर हे डील कॅन्सल नाही झाले तर संपूर्ण देशभर मोठे आंदोलन होईल याची ट्रस्टीने दखल घ्यावी. समाजाला विश्वासात घेणारे विश्वस्त समजले जातात समाजाला धोका देणारे विश्वस्त समजले जात नाहीत.